प्रांजल खेवलकरांवर मानवी तस्करीचा संशय,तब्बल 28 वेळा रुम बुक?घ्या जाणून

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 पुण्यातील एका पार्टी प्रकरणात (Pune Rave Party) अटक करण्यात आलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांच्या विरोधात बीडमधील एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. प्रज्ञा खोसरे यांच्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेकडून ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीत प्रांजल खेवलकर यांनी खराडी भागातील ते हॉटेल 28 वेळा बुक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

प्रांजल खेवलकर यांनी या हॉटेलमध्ये अनेकवेळा मुलींना बोलावल्याचा आरोप करण्यात आला असून हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. 28 वेळा रूम बुक करणे हा संगठीत रॅकेटचा भाग असू शकतो असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली. महिला आयोगाने या आर्जनानंतर पुणे पोलीस करत असलेल्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचं म्हटलं. प्रांजल खेवलकर यांना त्यांच्या चार मित्र आणि दोन महिलांसह शनिवारी पहाटे खरडीत पार्टी करताना अटक करण्यात आली होती. या पार्टीत अंमली पदार्थ सापडल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगास कु. सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. सदर अर्जदाराने अर्जात, पुण्यात ज्या रेव्ह पार्टीवर छापा टाकण्यात आला त्यातील आरोपी श्री. प्रांजल खेवलकर यांनी २८ वेळा स्वतःच्या नावांने हॉटेल रुम बुक करुन अनेक वेळा..१/२

प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ-
प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडीओ आणि चॅट सापडल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. प्रांजल खेवलकर याने एका मुलीचे व्हिडीओ दुसऱ्या आरोपीला पाठवत ‘ऐसा माल चाहिए’ असा मेसेज केला आहे. या सर्व प्रकरणाचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींची पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

कोण आहेत प्रांजल खेवलकर?
प्रांजल खेवलकर राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे ते दुसरे पती आहेत, पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांचा बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केलं. सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंबीयांचं मुक्ताईनगरमध्ये वास्तव्य आहे. प्राजंल खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. पत्नी रोहिणी खडसे राजकारणात सक्रिय आहे, पण पती प्रांजल हे राजकारणापासून लांब आहेत. खेवलकर रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहे. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहितीही समोर आली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *