प्रकाश आंबेडकर यांनी केली तिस-या आघाडीची घोषणा
प्रकाश आंबेडकरांनी मविआशी फारकत घेत तिस-या आघाडीची घोषणा केलीय.. वंचित बहुजन आघाडीच्या 8 उमेदवारांची यादी आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. आंबेडकरांनी नागपूरमधून काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय तर अकोल्यातून स्वत: लढण्याची घोषणा केलीय.. प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन पक्षानं सांगलीतून उमेदवार उभा केल्यास त्यांना पाठिंबा देण्याची घोषणाही आंबेडकरांनी केलीय..पत्रकार परिषद घेत तिस-या आघाडीचे स्पष्ट संकेत दिलेत. त्याचवेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी पक्षाच्या आघाडीची घोषणा करत 8 उमेदवारांची यादी जाहीर केली. आंबेडकरांनी नागपूरमधून काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय तर मनोज जरांगेंशी आघाडीबाबत चर्चा झाली असून 30 तारखेला जरांगे आपला निर्णय जाहीर करणार आहेत, असंही आंबेडकरांनी सांगितलंय.
सांगलीमधून प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन पक्षाने उमेदवार उभा केल्यास त्यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणाही आंबेडकरांनी केलीय. तसंच नागपूरमधून काँग्रेसला बिनशर्त पाठिंबाही जाहीर केलाय. महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेताना आंबेडकरांनी जरांगेंसोबत नवी आघाडी केलीय.. प्रकाश आंबेडकरांनी अंतरवाली-सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली. वंचितच्या घडामोडींना त्यानंतर वेग आला. एकीकडे वंचितने मविआसोबत फारकत घेतली असली तरीही वंचितने मविआसोबत यावं अशी आग्रही भूमिका मविआच्या नेत्यांनी घेतलीय.
मनोज जरांगे पाटील वंचितसोबत
2019 मध्ये वंचित स्वतंत्र लढल्यामुळे लोकसभेला 7 ते 8 आणि विधानसभेला 10 ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला थेट फटका बसला होता. वंचितसोबत यंदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आहेत. जरांगे 30 मार्चपर्यंत भूमिका घेणार आहेत. वंचितचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते. त्यामुळे आम्ही आता वेगळा निर्णय घेत आहोत. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होणार आहे, हे मला माहीत आहे. मात्र मी लोकांची नस ओळखतो असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. वंचितचे उमेदवार मुस्लिम, जैन, ओबीसी, गरीब वर्गातले असतील. त्यासोबतच मराठा आंदोलक मनोज जरांगेंसोबतही वंचितने नवी आघाडी केलीय.. तेव्हा प्रकाश आंबेडकरांचा हा नवा पॅटर्न किती यशस्वी होतोय… की मविआला याचा फटका बसून भाजपप्रणित महायुतीला याचा फायदा होतोय? हे येणा-या लोकसभा निवडणुकीतच कळणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीतील उमेदवार
चंद्रपूर : राजेश बेले
बुलडाणा : वसंतराव मगर
अकोला : प्रकाश आंबेडकर
अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा : प्रा. राजेंद्र साळूंके
यवतमाळ-वाशिम : खेमसिंग पवार
नागपूर : काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा
सांगली : प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीला पाठिंबा देणार