प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल; अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकर यांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती पक्षातील प्रवक्त्यांनी दिली आहे.

हृदयात रक्ताची गाठ असल्याने त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील ३ ते ५ दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील ३-५ दिवस बाळासाहेब रूग्णालयात डॉक्टरांच्या निरिक्षणात राहणार असल्याने, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.

पहा पोस्ट:


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *