लेखणी बुलंद टीम:
मुंबईत शनिवारी एका पोर्श कारने अनेक मोटारसायकलींना धडक दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानि झाली नाही. पोर्श कार एका व्यावसायिकाचा मुलगा चालवत होता.
शनिवारी मुंबईतील वांद्रे परिसरात एका वेगवान पोर्श कारने फूटपाथवर उभ्या असलेल्या मोटारसायकलला धडक दिली. पोलिसांनी कार चालकाच्या विरोधात निष्काळजीपणा आणि रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 2.40 च्या सुमारास सद्गुरू वासवानी चौकाजवळ हा अपघात झाला. कार चालवणारा हा एका प्रतिष्ठित व्यावसायिकाचा मुलगा आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानंतर भरधाव वेगात आलेल्या पोर्शने फूटपाथवर उभ्या असलेल्या अनेक मोटारसायकलींना धडक दिली.मुलासोबत कार मध्ये एका मूलीसह 5 जण होते.पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.