सनम तेरी कसम हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झाल्यापासून चांगली कमाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे .या चित्रपट प्रदर्शित झाला असून पाच दिवस पूर्ण केले असून याचे कलेक्शन प्रभावी आहे. हर्षवर्धन राणे आणि मावरा होकाणे यांचा हा रोमँटिक ड्रामा नऊ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि तरीही हा चित्रपट प्रेक्षकांना भुरळ पाडण्यात यशस्वी ठरला आहे. हा चित्रपट चांगलाच गाजत आहे.
अंदाजानुसार आज या चित्रपटाने 2.55 कोटी ते 2.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हर्षवर्धन राणे आणि मावरा होकाणे अभिनीत ‘सनम तेरी कसम’ या रोमँटिक-ड्रामा चित्रपटाच्या रिलीजला चांगले प्रेम मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित या चित्रपटाने मंगळवारीही उत्कृष्ट कामगिरी केली. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, सनम तेरी कसम पाचव्या दिवशी 2.55 कोटी ते 2.85 कोटींच्या दरम्यान कमाई करू शकते. सोमवारी चित्रपटाने सुमारे 3 कोटींचा व्यवसाय केला आहे. 2016 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट बैडएस रवी कुमार आणि लवयापा सारख्या नवीन चित्रपटांना जोरदार टक्कर देत आहे.
या चित्रपटाने आपल्या मूळ प्रदर्शनाचा विक्रम यापूर्वीच मोडला असून सनम तेरी कसमने तेव्हा अवघ्या दोन दिवसांत ८ कोटींची एकूण कमाई केली होती. 2025 च्या पहिल्या शनिवारपर्यंत या चित्रपटाने 9 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.
या चित्रपटाने आपल्या मूळ प्रदर्शनाचा विक्रम यापूर्वीच मोडला आहे. सनम तेरी कसमने २०१६ मध्ये ८ कोटींची एकूण कमाई केली होती. 2025 च्या पहिल्या शनिवारपर्यंत या चित्रपटाने 9 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. सनम तेरी कसम तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये सुरू आहे. हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन स्टारर या चित्रपटाची जादू आजही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.