मिरा -भाईंदर येथे पोलिसाची राहत्या घरात आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मिरा – भाईंदर ( प्रतिनिधी ) :  एका पोलिस हवालदाराने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिस हवालदाराने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहे. आत्महत्याच्या या घटनेनंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर अथनीकर असं आत्महत्या करणाऱ्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. सागर हे मिरा-भाईंदर ,वसई- विरार येथील पोलिस आयुक्तालयामध्ये कार्यरत होते. ते आपल्या पोलिस मित्रासोबत मीरारोड येथील अपना घर फेस या संकुल परिसरात राहत होते. पोलिस मित्राने त्यांच्या आत्महत्येची माहिती काशीगाव येथील पोलिस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सांयकाळी ते घरी एकटे असताना त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आणि आपली जीवनयात्रा संपवली. सागर आपल्या खोलीत झोपले होते. बराच वेळ झाला त्यांनी दरवाजा उघडला नसल्यामुळे मित्राला चिंता वाटू लागली. त्यांनी आणखी एकाच्या मदतीने सागर यांच्या खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळीस ते पख्यांला लटकलेले दिसले.

मित्रांच्या मदतीने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंरतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी सागर यांचा मृतदेह ताब्यात घेतला. राहत्या घरात तपासणी केली परंतु तेथे कोणतीही सुसाईट नोट सापडली नाही. पोलिसांनी या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली. पोलिस हवालदराच्या आत्महत्याच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पुढील तपास PSI शेख हे करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *