‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसानचे 2000 रुपये, घ्या जाणून

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांची रक्कम पाठवली जाते. आतापर्यंत या योजनेच्या 18 हप्त्यांच्या माध्यमातून 36000 रुपये पाठवण्यात आले आहेत.

केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून ही योजना राबवली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे.बिहार राज्यातील भागलपूर मधील कार्यक्रमाला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्या कार्यक्रमामध्ये 19 व्या हप्त्याची रक्कम 9.7 कोटी शेतकऱ्यांना पाठवली जाईल.देशातील सर्व राज्यातील शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थ आहेत. सर्वाधिक लाभार्थ्यांची संख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशातील पात्र शेतकऱ्यांची संख्या 2 कोटी 25 लाख 94147 इतकी आहे. त्यापैकी 16 ऑक्टोबर पर्यंतच्या आकडेवारीनुसार 2 कोटी25 लाख 72533 शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानची रक्कम पाठवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक लाभार्थी महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात 91 लाख 51 हजार 365 लाभार्थी महाराष्ट्रात आहेत. यापैकी 91 लाख 41 हजार 980 लाभार्थ्यांच्या खात्यात पीएम किसानची रक्कम पाठवण्यात आली आहे.

महाराष्ट्रानंतर तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश राज्य आहे. मध्य प्रदेशात 81 लाख 41 हजार 172 लाभार्थी आहेत. त्यापैकी 81 लाख 36 हजार 098 लाभार्थ्यांना लाभाची रक्कम मिळाली आहे. हारमध्ये 76 लाख,राजस्थानमध्ये 7036500 पीएम किसानचे लाभार्थी आहेत. गुजरातमध्ये 49 लाख 14 821 लाभार्थी आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *