थोड्याच वेळात पीएम किसानचा हप्ता जमा होणार; पैसे आलेत की नाही असे करा चेक

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना ऐन सणासुदीत पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता मिळणार आहे. देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आज मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी येथे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. आज हरियाणा येथील विधानसभा निवडणूक-2024 साठी मतदान प्रक्रिया होत आहे. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगूल सुद्धा लवकरच वाजणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळणार आहे.

पीएम किसानचा 18 वा हप्ता थोड्याच वेळात

पीएम किसान योजनेच्या साईटवर अगोदरच हा हप्ता कधी जमा होणार हे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर, 2024 रोजी पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता जमा करतील. आज पोहरादेवी येथून मोदी हा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करतील. रब्बी हंगामाच्या तोंडावर आणि सणासुदीत हा हप्ता मदतीला येईल.

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 34,000 रुपये

पीएम किसान योजनेतंर्गत आतापर्यंत एकूण 17 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आज शेतकऱ्यांना 18 व्या हप्ता मिळणार आहे. या योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत केंद्र शासनाने 34,000 रुपये दिले आहेत. या योजनेत केंद्र सरकार प्रत्येकी 2 हजार रुपये जमा करते. शेतकऱ्यांना प्रत्येकी तीन हप्त्यातून वर्षाला 6 हजार रुपयांची मदत देण्यात येते.

तुमचे नाव यादीत आहे का?

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना मिळेल. पण त्यासाठी तुमचे नाव यादीत असायला हवे. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा. लाभार्थ्यांच्या यादीवर जा. तुमचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवा. “Get Data” वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स चेक करा. ई-केवायसी पूर्ण झाला असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तरच खात्यात पैसा येईल.

पैसे जमा झाले की नाही ते असे तपासा:

सर्वात अगोदर पीएम-किसान पोर्टल ‘https://pmkisan.gov.in’ वर जा.

या ठिकाणी ‘फार्मर कॉर्नर’ वर जाऊन ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ वर क्लिक करा.

या ठिकाणी आधार क्रमांक, खाते क्रमांक वा मोबाईल क्रमांक टाका.

आता खालील कॅप्चा कोड टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

त्यानंतर ‘गेट स्टेटस’ क्लिक करा.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएम-किसान खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे कळेल.

या क्रमांकावर करा कॉल

पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266

पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401

पीएम किसान हेल्पलाईन : 155261, 18001155266

पीएम किसान नवीन हेल्पलाईन क्रमांक : 011-24300606


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *