न्यू यॉर्कमध्ये एका चिखलाच्या शेतात दोन जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले (New York Plane Crash). अंडरशेरीफ जॅकलिन साल्वाटोर यांच्या म्हणण्यानुसार, कोलंबिया काउंटी शेरीफच्या कार्यालयाने दुपारी या अपघाताची पुष्टी केली. तथापी, त्यांनी या अपघातात किती लोक मारले गेले हे उघड करण्यास नकार दिला? फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने सांगितले की, मित्सुबिशी एमयू-2बी हे विमान हडसनजवळील कोलंबिया काउंटी विमानतळाकडे जात होते. परंतु कोपाकेजवळ सुमारे 30 मैल (48 किलोमीटर) अंतरावर ते कोसळले.
साल्वाटोर यांनी सांगितले की, चिखल, हवामान आणि बर्फवृष्टीमुळे प्रथमोपचारकर्त्यांना अपघातस्थळी पोहोचणे कठीण झाले. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाने अपघाताची चौकशी करण्यासाठी एक पथक नियुक्त केले आहे, जे शनिवारी संध्याकाळी न्यू यॉर्कमध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा – Plane Crashes In Florida: फ्लोरिडातील बोका रॅटन येथे लहान विमान कोसळले (पहा व्हिडिओ))
यापूर्वी 10 एप्रिल रोजी न्यू यॉर्क शहरात एक हेलिकॉप्टर अपघाताचे बळी ठरले होते. येथील हडसन नदीत झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात एका स्पॅनिश पर्यटक कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, मॅनहॅटनजवळील एका नदीत हेलिकॉप्टर कोसळले होते. या वर्षी आतापर्यंत अमेरिकेत अनेक विमान अपघात झाले आहेत.
फेब्रुवारीमध्ये विमान अपघात –
दरम्यान, फेब्रुवारीच्या सुरुवातीला, कॅन्ससमधील विचिटा येथून 64 जणांना घेऊन जाणारे अमेरिकन एअरलाइन्सचे विमान प्रशिक्षण मोहिमेवर असलेल्या तीन सैनिकांना घेऊन जाणाऱ्या आर्मी ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरशी धडकले. या धडकेमुळ दोन्ही विमाने पोटोमॅक नदीत पडली. या अपघातात आर्मी स्टाफ सार्जंट यांचा मृत्यू झाला.