लेखणी बुलंद टीम:
आयुर्वेदनं त्यांच्या प्रगत टेलीमेडिसिन सेंटरचं उद्घाटन केलं आहे. जगातील सर्वात मोठं आणि सर्वात योग्य आयुर्वेदिक टेलीमेडिसिन प्लॅटफॉर्म असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. या केंद्राचं उद्घाटन योग गुरु बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी वैदिक मंत्र आणि यंज्ञाद्वारे केलं आहे.
टेलीमेडिसिन
सेंटर हे मानव
सेवेचं
उत्कृष्ट पाऊल
बाबा रामदेव
टेलीमेडिसिन सेंटर उद्घाटन प्रसंगी स्वामी रामदेव यांनी म्हटलं की, ‘हरिद्वार पासून प्रत्येक घरापर्यंत हे टेलीमेडिसिन केंद्र भारताच्या ऋषी परंपरेच्या ज्ञानाला प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यामध्ये महत्त्वाचं साधन ठरेल. आता उपचार सेवा ऑनलाईन उपलब्ध असतील. ज्याचा लाभ आजारी व्यक्तींना मिळेल. पतंजलीचं टेलीमेडिसिन केंद्र मानवाच्या सेवेचं उत्कृष्ट पाऊल ठरेल.
या कार्यक्रमात आचार्य बाळकृष्ण यांनी म्हटलं की, “ज्या प्रकाकेर आज जगभरातून योगासाठी भारताकडे पाहिलं जाते. त्याच प्रकारे आता आयुर्वेद आणि त्याच्या इतर सेवांसाठी देखील जग भारताकडे आशेनं पाहिलं. हे टेलीमेडिसिन केंद्र त्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे. आचार्यांनी म्हटलं की पतंजली टेलीमेडिसिन केंद्र पूर्णपणे विकसित आणि एक सुव्यवस्थित मॉडेल आहे.
आयुर्वेदिक
टेलीमेडिसिन
सेंटरची वैशिष्ट्ये
निःशुल्क ऑनलाईन आयुर्वेदिक सल्ला
पतंजलीच्या उच्च प्रशिक्षित डॉक्टरांची टीम
प्राचीन शास्त्रांमधील व्यक्तिगत हर्बल उपाय
डिजिटल आरोग्य रेकॉर्ड आणि व्यवस्थित फॉलोअप (Follow-ups)
व्हाट्सअप, फोन आणि वेब-आधारित प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पोहोच
पतंजली आयुर्वेदाच्या दाव्यानुसार, हे पाऊल प्रत्येक घरात प्रामाणिक, शास्त्र आधारित आयुर्वेदिक आरोग्य उपचार पद्धतीचा आधार बनेल. प्रामुख्यानं दूर दूरवर राहणाऱ्या आणि विदेशात राहणाऱ्या लोकांना लाभ होईल, जे आरोग्य केंद्रावर जाऊ शकत नाहीत.
टेलीमेडिसिन केंद्राच्या माध्यमातून घरात बसून लोक आयुर्वेदिक डॉक्टरांकडून सल्लामसलत करु शकतात. ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांसाठी टेलीमेडिसिन केंद्र फायदेशीर ठरणार आहे. यामुळं आयुर्वेदिक उपचारांच्या सुविधा कमी असतील त्या ठिकाणी टेलीमेडिसिन केंद्राचा फायदा होऊ शकतो.