सांधेदुखी आणि संधिवाताच्या उपचारामध्ये पतंजलीच मोठं यश,घ्या जाणून

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

सांधेदुखी आणि संधिवाताच्या उपचारामध्ये पतंजलीनं मोठं यश मिळवलं असल्याचा दावा कंपनीनं केलाय. संस्थेच्या आयुर्वेदावर आधारित ‘ऑर्थोग्रिट’ या औषधाने संधिवाताच्या उपचारात उल्लेखनीय प्रभाव दाखवल्याचं कंपनीने सांगितलं. हा अभ्यास Elsevier प्रकाशनाच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रतिष्ठित Pharmacological Research – Reports या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. हे पतंजलीच्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आयुर्वेदाच्या शक्तीचं मोठं यश मानलं जात आहे. कंपनीचा दावा आहे, “हा अभ्यास दर्शवतो की ऑर्थोग्रिट संधिवातामुळे होणारी सूज कमी करते, कार्टिलेजचा झिज होण्यापासून बचाव करते आणि सांध्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवते.”

“ऑर्थोग्रिट आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानाचं अनोखा संगम: आचार्य बाळकृष्ण
पतंजली योगपीठाचे प्रमुख आचार्य बालकृष्ण म्हणाले, “आजच्या काळात गुडघेदुखी आणि संधिवात ही वयोवृद्ध लोकांमध्ये सामान्य समस्या बनली आहे. आधुनिक वैद्यकीय पद्धती फक्त लक्षणं दडपतात, पण आयुर्वेद रोगाच्या मुळाशी जाऊन त्याच्यावर उपाय करतो. ऑर्थोग्रिट हे आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान यांचं एकत्रित रूप आहे, ज्यामध्ये संधिवातासारख्या गुंतागुंतीच्या आजारावर मुळापासून मात करण्याची क्षमता आहे.”

पतंजलीचा दावा आहे की ऑर्थोग्रिटमध्ये वचा, मोथा, दारूहळद, पिप्पलमुळ, अश्वगंधा, निर्गुंडी आणि पुनर्नवा यासारख्या नैसर्गिक औषधी वनस्पतींचा समावेश आहे. या सर्व घटकांचा वापर प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सांधेदुखी आणि सूज यावर प्रभावी उपाय म्हणून करण्यात आला आहे.

पतंजलीचं मोठं यश! आयुर्वेदिक औषध ‘ऑर्थोग्रिट’मध्ये सांधेदुखी आणि संधिवातावर मात करणयची क्षमता, आचार्य बाळकृष्ण म्हणाले..

कोट्यवधी लोकांना त्रास देणाऱ्या आजारावर उपाय ,वैज्ञानिकांचं मत
पतंजली अनुसंधान संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अनुराग वार्ष्णेय यांनी सांगितलं की संधिवात हा एक जुना आणि वेदनादायक आजार असून, जगभरातील कोट्यवधी लोकांना तो त्रास देतो. या अभ्यासात मानवी कार्टिलेज पेशींच्या 3D Spheroids आणि C. elegans (एक मॉडेल जीव) यांच्यावर प्रयोग करण्यात आले. अभ्यासात असं दिसून आलं की ऑर्थोग्रिटनं मानवी कार्टिलेज पेशींना सूज निर्माण करणाऱ्या घातक परिणामांपासून वाचवलं, Reactive Oxygen Species (ROS) कमी केल्या आणि IL-6, PEG-2, IL-1β यांसारख्या सूजसंबंधित मार्करचं प्रमाण घटवलं.

त्याचप्रमाणे, ऑर्थोग्रिटनं JAK2, COX2, MMP1, MMP3 आणि ADAMTS-4 यांसारख्या जीनच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण मिळवलं. C. elegans वर केलेल्या प्रयोगांत ऑर्थोग्रिटनं त्यांच्या आयुष्यमानात वाढ केली, हालचाली सुधारल्या आणि PMK-1, SEK-1, CED-3 यांसारख्या सूज-संबंधी जीनच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण मिळवलं.

पतंजलीचं म्हणणं आहे की “हा अभ्यास सिद्ध करतो की ऑर्थोग्रिट फक्त संधिवाताची लक्षणं कमी करत नाही, तर हा आजार वाढू नये यासाठीही प्रभावी ठरतो. हे यश आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान यांच्यात एक पूल निर्माण करत असून, संधिवातग्रस्त रुग्णांसाठी नव्या आशेचा किरण घेऊन आलं आहे. पतंजलीचा हा शोध केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर आयुर्वेदाला वैज्ञानिक मान्यता मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.”


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *