या जिल्ह्यात दहावीच्या बोर्डाच्या मराठी प्रश्नपत्रिकेची पेपरफुटी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आजपासून दहावीची बोर्ड परीक्षा सुरू झाली आहे. परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा प्रश्नपत्रिका गळती होऊ नये म्हणून परीक्षा केंद्रांवर अनेक खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यातील बदनापूरमध्ये दहावीच्या बोर्डाच्या पेपरफुटीची बातमी समोर आली आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर लगेचच मराठीचा पेपर फुटल्याचे बोलले जात आहे.

जालना जिल्ह्यातील बदनापुर तालुक्यात तळणी गावात परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर फुटला आहे. विद्यार्थ्यांचे पालक प्रत घेण्यासाठी मोठ्या संख्येने परीक्षा केन्द्रावर जमले होते. या गर्दीत पालक असल्याचे व्हिडिओ समोर आले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. ही परीक्षा 17 मार्चपर्यंत सुरू राहील. या परीक्षेसाठी एकूण 16,11,610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी 8,64,920 मुले आणि 7,47,471 मुली आहेत आणि 19 ट्रान्सजेंडर आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या 2 हजार 165 ने वाढली आहे. पेपर फुटीच्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *