राज्याची आर्थिक राजधानी मुंबईमधून एक अतिशय धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. केवळ कर्जाची परतफेड न केल्याने कुणी इतकं निर्दयीपणे (Mumbai Crime) कसं वागू शकतं, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. त्यामागील कारण म्हणजे कर्जाची परतफेड न करू शकलेल्या दोन तरूणांना मोठी किंमत मोजावी लागली असून या घटनेने सर्वत्र संतापची लाट पसरली आहे.
यात मुंबईतील चार जणांनी मिळून एक अल्पवयीन आणि एक 19 वर्षीय तरूणासोबत अमानवी कृत्य केलं आहे. केवळ पैसे वेळेवर न दिल्याने या दोघांना मुखमैथुन करायला लावले असल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. हे कृत्य करणारे इथवरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडित तरुणांना निर्वस्त्र केले. सोबतच त्यांचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी ही दिली.
ओरल सेक्स करण्यास भाग पडलं, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
दरम्यान, या घटनेनंतर पीडित मुलांपैकी एकाच्या आईने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला प्रकार सांगितला. सोबतच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढे आलेल्या माहितीनुसार, यातील मुख्य आरोपी दिलीप गोस्वामीने पीडित 19 वर्षीय मुलाला फसवून कारमधून पुण्याला नेले. या प्रवासादरम्यान कारमध्ये दिलीपचे मित्र धीरज, पंजुभाई गोस्वामी आणि भरत यांनी दोन्ही मुलांना मारहाण केली. यात बेल्ट आणि लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केलीय. त्यानंतर ते पुण्यातून पुन्हा दक्षिण मुंबईतील भुलेश्वर भागात परतले. यावेळी त्यांनी या दोन्ही पीडित तरुणांना घरात डांबून ठेवलं. कालांतराने तिथे देखील त्यांना मारहाण करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी त्यांना ओरल सेक्स करण्यास भाग पाडले.हे कृत्य करणारे इथवरच थांबले नाहीत तर आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि पैसे परत न केल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जाईल. अशी धमकी ही दिली.
मुख्य आरोपीला अटक, इतर साथीदार अद्याप फरार
या संतापजनक घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून एलटी मार्ग पोलीस स्टेशनची टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. तर हे कृत्य करणारे इतर आरोपी अद्याप फरार असून पोलीस सध्या या फरार आरोपींचा शोध घेत आहे. तर यातील पोलिसांनी मुख्य आरोपी दिलीप गोस्वामी उर्फ ऋतिकला अटक केली आहे. त्याचे तीन साथीदार धीरज, पंजुभाई गोस्वामी आणि भरत फरार आहेत. दुसरीकडे पीडित मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू असून या तरुणांची मानसिक स्थिती अतिशय नाजूक असल्याची माहिती आहे. सध्या त्यांना समुपदेशन केले जात आहे.