दिल्ली पोलिसांनी राजधानीतील शाहदरा जिल्ह्यातील कैलाश नगर भागात अनेक कुत्र्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी एका नराधमाला अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी काल (शनिवारी, ता-12) ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्राणी स्वयंसेवी संस्थेने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी नौशादला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी शाहदरा येथील कैलाश नगर येथून एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर अनेक कुत्र्यांवर अनैसर्गिक अत्याचाराचा केल्याचा आरोप केला आहे. आरोपीचे नाव नौशाद असे आहे. एका स्वयंसेवी संस्थेने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
नराधमाने कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचाराचा केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे, असे दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. व्हिडिओमध्ये त्या माणसाला लोक मारहाण करताना आणि त्याने किती कुत्र्यांवर अत्याचार केला आहे, असे विचारताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका प्राणी प्रेमीने सोशल मिडिया एक्सवरती शेअर केला आहे. अनैसर्गिक अत्याचाराचा आरोप असलेल्या त्या व्यक्तीला अनेक लोक त्याला मारहाण करत आहेत. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला विचारताना ऐकू येते की, तू किती कुत्र्यांवर अत्याचार केला आहे? प्राणी प्रेमीने दिल्ली पोलिस, मुख्यमंत्री रेखा गुप्ता, एलजी कार्यालय आणि इतर अनेक नेत्यांनाही हा व्हिडिओ टॅग केला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीने किमान 12-13 मादी कुत्र्यांवरअनैसर्गिक अत्याचाराचा आरोप एनजीओने केला आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे.
नौशाद हा बिहारचा रहिवासी
अटक केलेल्या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अटक केलेल्या आरोपीचे नाव नौशाद ( वय वर्षे 36) असे आहे, तो बिहारमधील सुपौल येथील रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध प्राणी क्रूरता कायद्याव्यतिरिक्त विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या आरोपींची चौकशी करून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी व्हायरल व्हिडिओही ताब्यात घेतला आहे.
मालक बाहेरगावी असताना कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार
एका विकृत इसमाने श्वानावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाहेर गावरून आल्यावरून सीसीटीव्ही तपासल्यानंतर घटना समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव हलीमुद्दीन शेख (वय 20 वर्षे सध्या राहणार सुंदर सोसायटी, हांडेवाडी, हडपसर, पुणे मूळ राहणार गाव कांदोरी थाना खडगाव जिल्हा मुर्शिदाबाद पश्चिम बंगाल) असून तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. सध्या तो हडपसरमधील हांडेवाडी परिसरात वास्तव्यास आहे. कुत्र्याचा मालक काही कामानिमित्त परगावी गेला असता ही घटना घडली आहे.