संतापजनक! शिक्षिकेने केले विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण, त्याला दारू पाजायची..

Spread the love

लेखणी बुलंद टीम :

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित शाळेतील इंग्रजी शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. शिक्षिकेने विद्यार्थ्याचे अनेक वेळा लैंगिक शोषण केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय, ती त्याला दारू पाजायची आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जायची तिथे ती त्याचे शोषण करायची.

पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, लैंगिक अत्याचार एक वर्षापेक्षा जास्त काळ चालू राहिले. जेव्हा कुटुंबाला विद्यार्थ्याच्या वागण्यात बदल दिसून आला तेव्हा त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली तेव्हा तो लैंगिक अत्याचाराबद्दल उघडपणे बोलल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंब गप्प राहिले कारण त्यांना वाटले की त्याला शाळेतून बाहेर पडण्यासाठी फक्त काही महिने शिल्लक आहेत. त्यांना वाटले की शिक्षिका मुलाचा पाठलाग थांबवेल, पण तसे झाले नाही. पोलिसांनी सांगितले की, या विद्यार्थ्याने यावर्षी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली होती, पण तो नैराश्यात होता. जेव्हा त्या शिक्षिकेने घरकाम करणाऱ्या महिलेच्या माध्यमातून पुन्हा मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रकरण पुन्हा वाढले. तिने भेटायचे आहे असा मेसेज पाठवला. “मग कुटुंबाने आमच्याकडे येऊन गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला,” असे पोलिसांनी सांगितले.

कधी झाली सुरूवात?
शिक्षिका 40 वर्षांची असल्याचे सांगितले जाते आणि ती विवाहित आहे. तिला एक मूल देखील आहे. तर, पीडित विद्यार्थी 11 वीत शिकत होता आणि तो 16 वर्षांचा होता. तक्रारीत म्हटले आहे की, डिसेंबर 2023 मध्ये हायस्कूलच्या वार्षिक कार्यक्रमादरम्यान एका ती विद्यार्थ्याच्या अनेक वेळा संपर्कात आली. त्यानंतरच ती त्याच्याकडे आकर्षित झाली. जानेवारी 2024 मध्ये तिने पहिल्यांदाच विद्यार्थ्याला नात्यासाठी विचारणा केली. सुरुवातीला विद्यार्थ्याने अंतर राखण्यास सुरुवात केली. त्यानंतर, शिक्षकाने शाळेतील तिच्या एका महिला मैत्रिणीची मदत घेतली आणि प्रकरण पुढे नेलं. या प्रकरणी महिला मैत्रिणीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने पीडित विद्यार्थ्याला सांगितले की ते एकमेकांसाठी बनले आहेत आणि वयस्कर महिला आणि मुलांमधील संबंध सामान्य आहेत.

एका मित्राशी बोलल्यानंतर, विद्यार्थ्याने शिक्षिकेला भेटण्याचा निर्णय घेतला. एका अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, ‘ती (शिक्षिका) विद्यार्थ्याला तिच्या कारमधून एका निर्जन ठिकाणी घेऊन गेली आणि जबरदस्तीने त्याचे कपडे काढले आणि त्याचा विनयभंग केला.’ तो म्हणाला, ‘पुढील काही दिवसांत, विद्यार्थ्याला त्रास होऊ लागला, म्हणून त्याला तिने गोळ्याही दिल्या.’ यानंतर, शिक्षिका विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जाऊ लागली. त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पोलिसांनी सांगितले की, शिक्षकाने अनेक वेळा विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी त्याला दारू पाजली. आरोपी शिक्षिकेला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *