संतापजनक ! ध्वनी प्रदूषणाची तक्रार केली म्हणून तरुणीला सरपंचाची बेदम मारहाण

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला (Female Lawyer Beating) सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण केली गेलीय. यात पाईपच्या माराने अंग काळनिळं पडल्याचे ही पुढे आले आहे. किरकोळ वादातून उफाळून आलेल्या या अमानुष मारहाणीचा प्रकार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक्सवर पोस्ट केल्यानंतर समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आला असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टनंतर समोर आला मारहाणीचा प्रकार
पुढे आलेल्या माहिती नुसार, घटनेतील पडीत महिलेने ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने घरापुढील लाऊडस्पिकर, पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. यानंतर या वकील महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीनंतर ही महिला बेशुद्ध देखील पडली होती. त्यानंतर तिला उपचारानंतर घरी पाठवल्याचे या पोस्ट मध्ये म्हटले आहे. या मारहाणीनंतरचे फोटो देखील आता समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिल्यानंतर अंबाजोगाई तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शेतात रिंगण करून काठ्या आणि जे.सी.बी पाईपने जबर मारहाण
अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीली करणार्‍या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जे.सी.बी पाईपने जबर मारहाण केली आहे. यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातुन ही एका रात्रीत उपचार करून घरी पाठवलं आहे. सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळुन एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल, कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत विचारला आहे. त्यामुळे या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *