संतापजनक! कर्तव्यावर असताना पोलिसाने केले दारूच्या नशेत चिमुकलीसोबत अश्लील चाळे

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. लोणावळ्याच्या पोलिसाचे दारूच्या नशेत चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला रक्षकचं भक्षक बनल्याचं दिसून आलं आहे. एका पोलीस शिपायाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचं समोर आलं आहे. कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता, याचं नशेत त्याने पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे केले आहेत. याप्रकरणी सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार काल (बुधवारी) नाताळ दिवशीचं घडला.

नाताळची सुट्टी असल्यानं पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते, म्हणून नराधम पोलीस सस्ते तिथं बंदोबस्तावर होता. तिथल्याच एका हॉटेलमधून त्याने भाकरी घेतली आणि जेवण केलं. त्या भाकरीचे बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला, तेव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता. त्यावेळी तिथं पाच वर्षीय चिमुरडीला सस्तेने पाहिलं. लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. मुलीने विरोध केला, मग तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस असं तो तिला म्हणाला. मात्र घडला प्रकार मुलीने आईला सांगितला आणि या नराधम पोलिस रस्तेचं बिंग फुटलं. ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता, त्याचं पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

चिमुकल्या मुलीच्या आजीने सांगितली हकीकत
आम्ही विसापूरच्या पायथ्याशी राहतो. आमचं तिथं घर आहे. आमचा छोटी मुलगी तिथं वाळूच्या ढिगाऱ्यावरती खेळत होती. मी त्या पोलिसाला जेवायला दिलं, त्यानंतर मी शेतावर गेले, मुलगी तिकडे खेळत होती, आणि माझी सून आणि भाची घरामध्ये स्वयंपाक बनवत होत्या. माझी सून जेव्हा काऊंटरजवळ आली तेव्हा त्या लहान मुलीने आपल्या आईकडे येऊन सांगितलं, त्या पोलिस काकांनी मला मागं नेलं आणि माझ्या अंतर्वस्त्रांमध्ये हात घातला. ती रडत होती, आणि घाबरली होती. सुनेने आणि माझ्या मुलाने मला फोन केला. मी घरी आले. तेव्हा माझ्या मुलाने मला सर्व घटना सांगितली. त्यानंतर आम्ही पोलिसांना बोलावलं. त्यांनी विचारलं काय झालं, तेव्हा त्यांना सर्व माहिती दिली, जर कायद्याचे रक्षक असं वागतं असतील तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा असं त्या चिमुकल्या मुलीच्या आजीने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.

खाकी घातलेल्या त्याने पोलिसांनी दारू पिलेली होती. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, कायद्याचं रक्षण करणारे लोक जर असे गरिबाची छेड काढायला लागले तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा असा सवाल देखील त्या चिमुरड्या मुलीच्या आजीने उपस्थित केला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *