पुण्याच्या दौंडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली असून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. दौंडच्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील स्वामी चिंचोली हद्दीत पुण्याहून सोलापूरचे दिशेने जाणारे खाजगी वाहन चहा पिण्यासाठी एका चहाच्या टपरीवर थांबले होते.
त्यावेळेस एका वाहनावर दोन युवक आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढले. तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या अल्पवयीन मुलीला दोन अज्ञात इसमांनी एका टपरीच्या पाठीमागे नेऊन अत्याचार केला.दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोलीच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला आहे. यावेळी घटनास्थळी दौंड पोलीस दाखल झाले. त्यानंतर दौंड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.