संतापजनक! एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये प्रवाशाकडून महिला क्रू मेंबरचा विनयभंग

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

दुबईहून जयपूरला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमान IX-196 मध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने एका महिला क्रू मेंबरचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. विमान रात्री 12:45 वाजता निघाले आणि पहाटे 2:40 वाजता उतरले. 15-B मध्ये बसलेल्या आरोपीला निर्बंध असूनही दुबई ड्यूटी फ्रीच्या बाटलीतून दारू पिताना पकडण्यात आले. जेव्हा एअर होस्टेसने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने गैरवर्तन केले. इतर प्रवाशांना सेवा देत असताना तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. त्याला असे न करण्यास सांगण्यात आले होते. तरीही, तो थांबला नाही. विमान उतरल्यानंतर त्याने त्याचा बोर्डिंग पास देण्यास नकार दिला आणि चौकशी टाळण्याचा प्रयत्न केला. अखेर सीआयएसएफ कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले. त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. जयपूर विमानतळ पोलिस ठाण्यात विनयभंगाची औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एअर इंडिया एक्सप्रेस की दुबई-जयपुर फ्लाइट में एयर होस्टेस के साथ पैसेंजर ने की छेड़खानी

 

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *