संतापजनक! जन्मदात्या आईला लोखंडी पाईपने मारहाण,आईचा मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

जिल्ह्यातील धारूर (Beed) तालुक्यात धक्कादायक घटना घडली असून मुलानेच जन्मदात्या आईचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलानेच आपल्या आईला लोखंडी पाईपने मारहाण केल्यानंतर जखमी अवस्थेत आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आईने आपले प्राण सोडले. आपल्या पोटच्या गोळ्यानेच, आपल्याच मुलाने लोखंडी पाईपने केलेले आघात आईला सहन न झाल्याने या मारहाणीत आईचा जीव गेला. सुवर्णमाला बांगर असं मृत महिलेचं नाव असून दत्ता बांगर असं मुलाचं नाव आहे. याप्रकरणी, पोलिसांनी (police) आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

धारुर तालुक्यातील तरनळी गावात सुवर्णमाला आपल्या घरासमोर बसल्या असता, त्यांचा मुलगा दत्ता बांगर याने घरात जाऊन लोखंडी पाईप आणत त्याच पाईपाने आईच्या डोक्यात मारहाण केली. मारहाण करताना दत्ता याचा लहान मुलगा देखील समोर होता. मात्र, दत्ता हा मारहाण करताना थांबला नाही. त्यावेळी, त्यांच्या बाजूला असलेल्या भावजाईला देखील दत्ता बांगर याने जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, लेकाकडून झालेल्या या मारहाणीत रक्तबंबाळ झालेल्या सुर्णमाला बांगर यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वादाती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दत्ता बांगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी अटक देखील केली आहे. याप्रकरणी, आरोपी मुलाला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, आरोपी दत्ता याचा सर्व कुटुंबाला त्रास असल्याचे त्याच्या बहिणीने सांगितले. याआधीही त्याने त्याच्या चुलत्याला त्रास दिला होता. त्यामुळे, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तो तुरुंगातून सुटल्यास त्याच्या वडिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना पुन्हा मारहाण करू शकतो. त्याच्यापासून या सर्वांच्या जीवाला धोका असल्याचे देखील त्याच्या बहिणीने माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *