पुणे जिल्ह्यातील एका गावामध्ये दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर (Pune Crime News) जन्मदात्या बापानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. आपल्याच लेकीसोबत असं कृत्य करणाऱ्या नराधम बापास राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात जुलै 2020 मध्ये ही बाप लेकीच्या नात्याला आणि माणुसकीला काळिमा फासणारा घटना घडली होती.(Pune Crime News)
पीडित मुलगी ही तिचे आई-वडील आणि भाऊ यांच्यासोबत राहत होती. पिडीतेचा वडील इलेक्ट्रिशियन म्हणून मिळेल ते काम करत होता. 31 जुलै 2020 रोजी तो कामावरून घरी आला. आई-वडील, भाऊ आणि ती या सर्वांनी मिळून एकत्र रात्रीचे जेवण केलं. जेवणानंतर पीडित मुलीची आई आणि वडील एका ठिकाणी, तर भाऊ आणि बहीण एका ठिकाणी झोपणार होते. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या नराधम बापाने पीडित मुलीला आपल्याजवळ झोपण्याचा आग्रह केला. पिडीत अल्पवयीन मुलीला, तिच्या आईला आणि भावाला कुऱ्हाडीचा धाक दाखवून नराधम बापाने जिवे मारण्याची धमकी दिली. (Pune Crime News)
पीडित अल्पवयीन मुलगी बापाजवळ झोपल्यानंतर कुऱ्हाडीचा धाक दाखवत नराधम बापाने स्वतःच्या मुलीवर बलात्कार केला. यावेळी आई आणि भावाने विरोध केला असताना त्यांना कुऱ्हाडीने जिवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत पीडितेने आळंदी पोलिस ठाण्यात नराधम बापाच्या या कृत्याविरोधात फिर्याद दिली होती. आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात जुलै 2020 मध्ये ही घटना घडली होती.
आळंदी पोलिसांनी बलात्कार, बाललैंगिक अत्याचारविरोधी अधिनियम (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करून नराधम बापाला पोलिसांनी अटक केले होती. पोलिस उपनिरीक्षक एस. ए. चव्हाण यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला होता. त्या नराधम बापाला आता पाच वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
31 जुलै 2020 रोजी नराधम बाप कामावरून घरी आला. घरातील सर्वांनी मिळून एकत्र रात्रीचं जेवण केलं. जेवणानंतर पीडित मुलीची आई आणि वडील एका ठिकाणी, आणि तिचा भाऊ ती दुसऱ्या ठिकाणी झोपणार होते. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या नराधम बापाने पीडित मुलीला आपल्याजवळ झोपण्याचा आग्रह धरला. त्यानंतर कुऱ्हाडीचा धाक दाखवून त्याने आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केला, तिच्या आईने आणि भावाने विरोध केल्यानंतर नराधम बापाने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात जुलै 2020 मध्ये ही घटना घडली होती.