महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून अकोल्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार ही मुलगी डोंबिवली परिसरातील मानपाडा येथील आडिवली येथील रहिवासी आहे. कल्याण येथील सरकारी रेल्वे पोलिसांचे (जीआरपी) वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांनी सोमवारी सांगितले की, २० वर्षीय आरोपीने ३० जून रोजी मुलीला ट्रेनने अकोल्याला नेले आणि वाटेत तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी सांगितले की, अकोल्यात, तरुणाच्या पालकांनी त्याला आणि मुलीला त्यांच्या घरात येऊ दिले नाही, त्यानंतर तो तिला अकोला रेल्वे स्टेशनवर सोडून घरी परतला. अधिकाऱ्याने सांगितले की, अकोला जीआरपी कर्मचाऱ्यांनी किशोरीला स्टेशनवर पाहिले आणि तिची चौकशी केल्यानंतर तिने त्यांना गुन्ह्याबद्दल सांगितले. अकोला येथील जीआरपीने ‘शून्य एफआयआर’ नोंदवला आणि प्रकरण त्यांच्या समकक्षांकडे वर्ग केले. जीआरपी (कल्याण) ने तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे व आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.