लेखणी बुलंद टीम:
वाराणसीच्या चौबेपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बिरनाथीपूर गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी रात्री उशिरा दुचाकीस्वार हल्लेखोरांनी, एका दुकानदाराची गोळ्या झाडून हत्या केली. दुचाकीस्वार दुकानदाराला रात्री उशिरा दुकान उघडून सिगारेट देण्याचा आग्रह करत होते. दुकानदाराने त्याला नकार दिला, त्याने सांगितले की, दुकानाच्या चाव्या घरी आहेत आणि खूप उशीर झाला आहे त्यामुळे तो सिगारेट देऊ शकणार नाही. त्यानंतर सिगारेट न दिल्याच्या रागातून दुचाकीस्वरांनी दुकानदारावर गोळ्या झाडल्या आणि नंतर तेथून पळ काढला. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, रात्री दीडच्या सुमारास अज्ञात दुचाकीस्वार शारदा यादव यांच्या दुकानात आले आणि त्यांनी सिगारेट मागायला सुरुवात केली. शारदा यादव यांनी दुकान बंद असल्याचे सांगून आता सिगारेट सकाळीच मिळणार असल्याचे सांगितले. यावरून दोघांमध्ये वादावादी झाली व त्यांनतर त्यांनी यादव यांची गोळी झाडून हत्या केली.
पहा पोस्ट:
यूपी के वाराणसी में कल बदमाशों ने रात 12 बजे दुकानदार शारदा यादव से सिगरेट मांगी।
उन्होंने आधी रात में दुकान खोलने से मना कर दिया।
दबंग बदमाशों के हौसले तो देखिए एक ने उनका गला पकड़ा और दूसरे ने गोली चला दी जिससे शारदा यादव की मौत हो गई।
यूपी में जंगलराज कायम है। pic.twitter.com/7OnVukl4wg
— संजय यादव 🚲🇧🇾 (@SanjayYadav__SP) September 13, 2024