धम्म सम्राट अशोक बुध्द विहार व्यवस्थापन समिती आयोजित धम्मदीक्षा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
मिरा रोड : (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदर येथे धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार व्यवस्थापन समितीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा धम्मदीक्षा वर्धापन दिन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी धम्म रॅली काढण्यात. बुद्धमूर्ती, भिक्खू गण व बौद्ध उपासक सहभागी असलेल्या या रॅलीत लेझिम पथकाने आपले प्रात्यक्षिके दाखवून रॅलीतील सर्वांची मने जिंकून घेतली.
धम्म सम्राट अशोक बुध्द विहार येथील सामूहिक बुद्ध पूजेनंतर मुख्य सभागृहामध्ये भंते कीर्तीपियो नागसेन थेरो यांनी धम्मदेसना दिली. तसेच प्रा. मेघा नगराळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराची कारणे या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित केलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. मिरा भाईंदर मधील गायक कलाकारांनी त. बुद्ध, धम्म व डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर आधारीत काव्य, गायन सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आमदार गीता जैन यांनीही यावेळी मीरा भाईंदर मधील बौद्ध जनतेला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
माजी नगरसेवक अनंत शिर्के व भाईंदर मधील विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय तथा सांस्कृतिक संस्था संघटनांमध्ये कार्यरत असलेले विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. मीरा भाईंदर मधील बौद्ध जनतेने या कार्यक्रमाच्या पूर्ण आस्वाद घेतला आणि अशाच प्रकारचे विविध कार्यक्रम धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार व्यवस्थापन समितीने करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रा. उत्तम भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री कराडकर यांनी केले. प्रास्ताविक राजेश बडेकर यांनी केले तर आभार विलास जाधव यांनी मानले. धम्म सम्राट अशोक बुध्द विहार व्यवस्थापन समितीचे महानंद बडगे, प्रा. सुनिल धापसे, दिलीप सुरडकर, तिलोत्तमा वाळके, सुभाष ठोंबरे, विलास जाधव , सुनिल जाधव, नरेश मोहिते, पवन शिंदे यांनी व लहू तायडे, सुनिल कंटे, प्रकाश खरात, हरिश्चंद्र शिंदे, सचिन शिंदे, महेंद्र मोहिते, वर्षा बडेकर, प्रदीप कांबळे, राहुल खिल्लारे, प्रेरणा गोखले, भीमराव काकडे, जयदीप बनसोडे, सिद्धार्थ इंगळे, सिद्धार्थ वानखेडे, प्रा. विनोद बाजड, ॲड. सुदाम भगत, किसनराव आहीरे, मंदा काकडे, उज्वला भगत, मीना बनसोडे, पोपटराव शार्दुल, मिलींद वानखेडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मिरा भाईंदर परिसरातील धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते