मान्सून आता हळूहळू देशाला निरोप देत आहे, मात्र त्यानंतरही अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागा(IMD) नुसार, नैऋत्य मोसमी पावसाने मंगळवारी राजस्थान आणि गुजरातमधील आणखी काही भाग आणि पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांतून माघार घेतली आहे.
दरम्यान, दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी लोकांना उष्ण हवेचा सामना करावा लागत आहे. मात्र, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार लोकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने कोकण आणि गोव्यात २५ सप्टेंबरला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. यासोबतच IMD ने गुजरात, मध्य प्रदेश, विदर्भ, कर्नाटक, आसाम आणि मेघालयसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील 5 दिवस राज्यात कसे असेल हवामान जाणून घेणार आहोत.