500 रुपयांच्या उधारीसाठी भंगार विक्रेत्याकडून एकाची  हत्या

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

ठाणे पोलिसांनी गुरुवारी एका 28 वर्षीय भंगार विक्रेत्याला अटक केली आहे. त्याने तेच काम करणाऱ्या एका व्यक्तीची हत्या केली आहे. व मृतदेह जाळून टाकला. भंगार विक्रेत्याने 500 रुपयांच्या उधारीसाठी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलीस अधिकारींनी दिलेल्या माहितीनुसार 3 ऑक्टोबर रोजी गंगारामपाडा येथील सुरेश तारासिंग जाधव (वय 35) यांचा अर्धवट जळालेला मृतदेह वडपे गावच्या परिसरात आढळून आला होता. तसेच पोलिसांनी प्रथम अज्ञात लोकांविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर माहिती आणि पुराव्यांच्या आधारे गुन्हे शाखेने आरोपी बारकू मारुती पडवळे याला अटक केली आहे.

तसेच चौकशी केली असतात त्याने एका साथीदारासोबत मिळून जाधव यांचा खून केल्याचे उघड झाले. साथीदाराला अजून अटक करण्यात आलेली नाही. तिघेही भंगार विक्रेते म्हणून काम करायचे.

मिळालेल्या माहितीनुसार जाधव यांनी 500 रुपये उसने घेतले होते, ते वारंवार सांगूनही ते परत करत नव्हते.खुनाच्या दिवशी जाधव यांना वडपे गावात नेऊन आरोपींनी पैशाची मागणी केली. कर्जावरून वाद वाढल्याने दोघांनी जाधव यांच्यावर लोखंडी रॉडने वार केले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह डस्टबिनमध्ये टाकून पेटवून दिला.अशी माहिती समोर आली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *