प्रसिद्ध फूड चेन मॅकडोनाल्डचे बर्गर खाल्ल्यानंतर एकाचा मृत्यू तर 49 आजारी; काय आहे ई. कोलाय संसर्ग?जाणून घ्या

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

अमेरिकेत प्रसिद्ध फूड चेन मॅकडोनाल्डचे बर्गर खाल्ल्यानंतर लोक आजारी पडल्याची घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर बर्गर खाल्ल्याने अमेरिकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून डझनभर लोक रुग्णालयात दाखल आहेत. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन म्हणतात की ही प्रकरणे मॅकडोनाल्डच्या बर्गर क्वार्टर पाउंडर हॅम्बर्गरशी जोडलेली आहेत. आजारी व्यक्तींमध्ये ई. कोलाय संसर्ग आढळून आला आहे.

अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये बाधित रुग्ण आढळले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बर्गर खाल्ल्यानंतर लोक आजारी पडण्याची प्रकरणे सप्टेंबरच्या अखेरीस सुरू झाली. बर्गर खाल्ल्याने संसर्ग होण्याची प्रकरणे अमेरिकेतील 10 राज्यांमध्ये आढळून आली आहेत, त्यापैकी सर्वाधिक 49 प्रकरणे कोलोरॅडो आणि नेब्रास्का सारख्या राज्यांमध्ये आढळून आली आहेत. बर्गर खाल्ल्यानंतर लोक आजारी पडल्याने मॅकडोनाल्डच्या प्रतिष्ठेवर परिणाम झाला असून कंपनीचे शेअर्स सहा टक्क्यांनी घसरले आहेत. सध्या दहा जणांना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

संशयास्पद हॅम्बर्गर आणि चिरलेला कांदा वापरण्यावर बंदी

यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने सांगितले की, बर्गर खाल्ल्यानंतर एका वृद्धाचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तपासणीत असे आढळून आले की ई. कोलायची लागण झालेल्या लोकांमध्ये एक गोष्ट साम्य आहे आणि ती म्हणजे त्यांनी मॅकडोनाल्ड्समध्ये क्वार्टर पाउंडर हॅम्बर्गर खाल्ले होते. तपासकर्त्यांचे म्हणणे आहे की संसर्गाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही, परंतु बर्गरमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिरलेला कांदा आणि बीफ पॅटीजवर तपास केंद्रित आहे. या दोन्ही वस्तू मॅकडोनाल्डच्या रेस्टॉरंटमधून पुढील तपासासाठी काढून टाकण्यात आल्या आहेत.

E. coli संसर्गाच्या लक्षणांमध्ये संक्रमित व्यक्तीमध्ये उच्च ताप, जुलाब आणि उलट्या यांचा समावेश होतो. त्याची लक्षणे साधारणपणे तीन ते चार दिवसांनी दिसू लागतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, संक्रमित व्यक्ती स्वतःहून बरी होते, परंतु काही प्रकरणे गंभीर असू शकतात आणि रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *