कोरोना महासाथीचा कहर जग अजूनही विसरलेले नाही. असे असतानाच आता या विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. आशिया खंडातील अनेक देशांत हा विषाणू वेगाने पसरत आहे.
कोरोना महासाथीचा कहर जग अजूनही विसरलेले नाही. असे असतानाच आता या विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. आशिया खंडातील अनेक देशांत हा विषाणू वेगाने पसरत आहे. हाँगकाँग आणि सिंगापूर या सारख्या शहरांत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. ब्लुमबर्गच्या रिपोर्टनुसार कोरोना विषाणूचा प्रसार पाहता त्या-त्या भागातील आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर गेले आहे.

हाँगकाँगमधील सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनच्या संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमख अल्बर्ट आऊ यांनी हाँगकाँगच्या स्थितीविषयी सविस्तर सांगितलं आहे. त्यांनी सांगितल्यानुसार हाँगकाँगमध्ये कोरोनाचा प्रसार वाढला आहे. गेल्या वर्षानंतर यावेळी विषाणूच्या प्रसाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तीन महिन्यांत कोरोनाची लागण झालेल्या गंभीर रुग्णाची संख्या 31 पर्यंत पोहोचली आहे.
चीनमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. 4 मेपर्यंत पाच आठवड्यात कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. थायलंडध्येही एप्रिल महिन्यात साजरा करण्यात आलेल्या साँगक्रान फेस्टिव्हलनंतर दोन वेळा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे.

दरम्यान, सध्याची ही परिस्थिती पाहता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.