लेखणी बुलंद टीम:
राष्ट्रपती या पदाला मोठा सन्मान असतो. भारतात तर राष्ट्रपती हे भारताचे पहिले नागरिक असतात. त्यांच्या सहिशिवाय कोणताही कायदा अमलात येत नाही. अन्य देशांतही राष्ट्रपतीला अधिकार बहाल केलेले असतात. फ्रान्समध्येही राष्ट्रपती हे पद आहे. सध्या फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदी इमॅन्यूएल मॅक्रॉन हे आहेत. त्यांचा एक व्हिडीओ मात्र सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या पत्नीनेच त्यांच्या कानशीलात लगावल्याचं दिसतंय.
सोशल मीडियावर हा कथित व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. इमॅन्यूएल मॅक्रॉन व्हिएतनामची राजधानी हनोई या शहराच्या दौऱ्यावर होते या दोऱ्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी ब्रिगिट यादेखील होत्या. यावेळी विमानातून उतरतानाचा ब्रिगेट आणि इमॅन्यूएल मॅक्रॉन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ब्रिकिट यांनी मॅक्रॉन यांना कानशीलात लगावल्याचं दिसतंय.
व्हिडीओत नेमकं काय दिसतंय?
सध्या व्हायरल होत असलेल्या कथित व्हिडीओत एक विमान दिसत आहे. या विमानात इमॅन्यूएल मॅक्रॉन आणि त्यांची पत्नी ब्रिगिट आहेत. हे दोघेही विमानातून उतरणार होते. त्याआधी त्यांच्यासोबतच्या एका अधिकाऱ्याने विमानाचा दरवाजा उघडला. याच वेळी इमॅन्यूएल मॅक्रॉन आणि त्यांची पत्नी ब्रिगिट यांच्यात काही संवाद चालू होता. याच संवादादरम्यान एक हात इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्या गालावर आल्याचं दिसतंय. हा हात दूर करण्याचा प्रयत्न इमॅन्यूएल मॅक्रॉन करताना या व्हिडीओत दिसत आहेत. त्यानंतर अधिकाऱ्याने दरवाजा उघडल्याचे दिसताच मॅक्रॉन यांनी समोर त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या लोकांना तसेच इतर अधिकाऱ्यांना हात वर करून अभिवादन केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
व्हिडीओ खोटा असल्याचं स्पष्टीकरण
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर फ्रान्सच्या राष्ट्रपतीभवनाने हा व्हिडीओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आल्याचा दावा करून तो व्हिडीओ खोटा असल्याचं सांगितलंय.
मॅक्रॉन-ब्रिगिट यांची लव्हस्टोरी
दरम्यान, इमॅन्यूएल मॅक्रॉन आणि ब्रिगिट यांनी प्रेमविवाह केलेला आहे. या दोघांच्याही वयात 24 वर्षांचा फरक आहे. मॅक्रॉन हे त्यांच्या पत्नीपेक्षा 24 वर्षांनी लहान आहेत. ब्रिगिट कधीकाळी मॅक्रॉन यांच्या शिक्षिका होत्या. मॅक्रॉन यांच्या कुटुंबीयांनी या विवाहास विरोध केला होता. पण त्यांनी हा विरोध झुगारून देत ब्रिगिट यांच्यासोबत लग्न केलं होतं. ब्रिगिटने आपल्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि 2007 साली या दोघांनी ब्रिगिट आणि मॅक्रॉन यांनी लग्न केलं. या दोघांचेही लग्न झाले त्यावेळी मॅक्रॉन हे 29 वर्षांचे तर ब्रिगिट या 54 वर्षांच्या होत्या. 2017 साली मॅक्रॉन फ्रान्सचे राष्ट्रपती झाले. तेव्हापासून ब्रिगिट या फ्रान्सच्या फस्ट लेडी झाल्या.
Emanuel Macron slapped by his wife. pic.twitter.com/u5bwovbzsV
— Sahed Mohammad (@21Sahed) May 26, 2025