आता ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ अर्ज करण्यासाठी 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ (My Preferred CIDCO Home Scheme) मध्ये सिडको कडून 26 हजार घरांसाठी सोडत जाहीर झाली आहे. पण आता या योजनेतील घरांसाठी अर्ज करण्ययासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी 11 डिसेंबरपर्यंत ही मुदतवाढ दिल्याचं सांगण्यात आले आहे. आतापर्यंत यासाठी 88 हजारांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे अर्जाची संख्या सव्वालाखापर्यंत पोहचेल असा अंदाज आहे.

दसर्‍या दिवशी नवी मुंबई मध्ये वाशी, खारघर, मानसरोवर रेल्वेस्थानक, खांदेश्वर रेल्वेस्थानक आणि तळोजा या परिसरातील 26 हजार घरांसाठी सिडको मंडळाने अर्जाची नोंदणी करण्यास सुरूवात केली आहे. सिडको कडून या घरांसाठी किंमती सांगण्यात आलेल्या नाहीत.

पहा कशी आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया

https://t.co/7ssWzlq4XV या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी योजनेसाठीचा मदत व्हिडिओ पहा.

व https://t.co/odrn0u6PVl वर टप्याटप्याने तुमची ऑनलाईन नोंदणी कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.https://t.co/BXERUTKp1q

— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) October 15, 2024

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी या उत्पन्न गटातील नागरिक अर्ज करू शकणार आहेत. यासाठी 6 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणारे एलआयजी श्रेणीत अर्ज करू शकतात. cidcohomes.com या वेबसाईट वर अर्ज करता येणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *