आता आधार पडताळणी UPI पेमेंट प्रमाणेच QR कोड स्कॅन करून पूर्ण करता येणार

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

डिजिटल सुविधा आणि प्रायव्हसी वाढवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, केंद्र सरकारने मंगळवारी एक नवीन Aadhaar app, लाँच केले आहे. ज्यामुळे युजर्सना त्यांचे आधार तपशील डिजिटल पद्धतीने पडताळता येणार आणि शेअर करता येतात. ज्यामुळे फिजिकल कार्ड बाळगण्याची किंवा फोटोकॉपी सादर करण्याची आवश्यकता दूर होणार आहे. Union Minister for Electronics and Information Technology, Ashwini Vaishnaw यांनी स्पष्ट केले की हे अॅप यूजर्सना त्यांच्या संमतीनेच सुरक्षित डिजिटल माध्यमांद्वारे आवश्यक डेटा शेअर करू शकणार आहे.

आधार पडताळणी आता UPI पेमेंट प्रमाणेच QR कोड स्कॅन करून पूर्ण करता येणार आहे. या अॅपच्या सादरीकरणामुळे हॉटेल, दुकाने किंवा विमानतळांसारख्या पडताळणी केंद्रांवर आधारच्या फोटोकॉपीज सादर करण्याची नियमित आवश्यकता संपण्याची शक्यता आहे.

सध्या बीटा चाचणी टप्प्यात असलेले हे अॅप दमदार गोपनीयता संरक्षणासह डिझाइन केले आहे.यामध्ये आता आधारच्या माहितीचा गैरवापर करता येणार नाही. सर्व माहिती सुरक्षितपणे आणि केवळ युजर्सच्या स्पष्ट संमतीने शेअर करता येणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1909641455770959903

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *