वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंड संघाने सलग तिसऱ्या विजयाची नोंद करताना गुणतालिकेत अव्वल स्थान पुन्हा पटकावले. न्यूझीलंडने आज चेन्नईत झालेल्या सामन्यात बांगलादेशवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील ११व्या सामन्यात न्यूझीलंड आणि बांगलादेश आमनेसामने आले होते. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा ८ विकेट्सने पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला . या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने ५० षटकांत ९ गडी गमावून २४५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने ४२.५ षटकांत २ गडी गमावून विजय मिळवला.दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांना मुकलेला केन विलियम्सन ( Kane Williamson) आज कर्णधाराच्या भूमिकेत दिसला. त्याने संयमी खेळ करताना ७८ धावांची खेळी केली आणि डॅरील मिचेलसोबत ( ) शतकी भागीदारी करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. पण, दुखापतीतून नुकत्याच सावरलेल्या केनला आजच्या सामन्यात पुन्हा दुखापत झाली आणि retiring hurt होऊन त्याला मैदान सोडावे लागले.
त्याची ही दुखापत गंभीर नसावी, अशी प्रार्थना चाहते करत आहेत. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक नाबाद ८९ धावा केल्या. कर्णधार केन विल्यमसनने ७८ धावांची खेळी केली. तो रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत परतला. तसेच डेव्हॉन कॉनवेने ४५ धावांचे योगदान दिले. रचिन रवींद्र नऊ धावा करून बाद झाला. ग्लेन फिलिप्सने नाबाद १६ धावा केल्या. मुस्तफिजुर रहमान आणि शाकिब अल हसन यांना प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याचबरोबर लॉकी फर्ग्युसन सामनावीर ठरल.