मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांची हत्येच्या तपासासाठी 1 जानेवारीला नेमलेली एसआयटी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी सात जणांची एसआयटी स्थापन करण्यात आलीय. पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेलीच या नव्या एसआयटीचे प्रमुख असणार आहेत. आधीच्या एसआयटीवर देशमुख कुटुंबाचा आक्षेप होता. या घटनेतील आरोपी एसआयटीतील अधिकाऱ्यांच्या संपर्कातील होते, असाही आरोप देशमुख कुटुंबीयांकडून करण्यात आला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी बीडचे पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केला. यावेळी एकही आरोपी सुटता कामा नये, अशा सूचना त्यांनी तपास यंत्रणांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि एसआयटी प्रमुखांना फोन करुन तपासात कुणालाही दयामाया दाखवू नका, असे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी तपासयंत्रणांना दिले आहेत.
संतोष देशमुखांच्या तपासाला नवीन SIT टीममध्ये कोण कोण?
– किरण पाटील (अपर पोलिस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर)
– अनिल गुजर (पोलिस उपअधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, बीड)
– सुभाष मुठे (पोलिस निरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, बीड)
– अक्षयकुमार ठिकणे (पोलिस निरीक्षक, भरारी पथक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
– शर्मिला साळुंखे (पोलिस हवालदार भरारी पथक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
– दीपाली पवार (हवालदार, सीसीटीएनएस, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
एसआयटीमधून वगळण्यात आलेले अधिकारी-
सहाय्यक पोलिस निरिक्षक- विजय जोनवाल
पोलिस उपनिरिक्षक महेश विघ्ने,
पोलिस उपनिरिक्षक आनंद शिंदे,
सहायक पोलिस उपनिरिक्षक तुळशीराम जगताप,
कर्मचारी मनोज वाघ,
कर्मचारी चंद्रकांत काळकुटे,
कर्मचारी बाळासाहेब अहंकारे,
धनंजय देशमुखांनी रात्री सीआयडी अधिकाऱ्यांची केजमध्ये घेतली भेट-
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांनी रात्री सीआयडी अधिकाऱ्यांची केजमध्ये भेट घेतली. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी देशमुख कुटुंबियांना हत्या प्रकरणी चर्चा केली. मात्र मिळालेल्या माहितीवर देशमुख कुटुंबीय तितकसं समाधानकारक नसल्याचं ते म्हणाले. या बैठकीला बसवराज तेली अनुपस्थित होते. ते आज दुपारी तीन वाजता पुन्हा देशमुख कुटुंबियांना भेटून तपशीलवार माहिती देणार आहेत. दरम्यान धनंजय देशमुखांनी मस्साजोगच्या ग्रामस्थांना आजचं आंदोलन एक दिवस पुढे ढकलण्यास सांगितलंय.