नामदेव जाधव नेमके कोण आहेत ? का आहेत चर्चेत
पुणे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. सध्या सत्ताधारी भाजपाला हवीशी भूमिका घेतल्याने ते चर्चेत आले आहेत. पाहा नामदेव जाधव नेमके कोण आहेत.
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने काळं फासलं ते नामदेव जाधव नेमके कोण आहेत ? राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टिका केल्यानंतर ते चर्चेत आले आहेत. नामदेवराव जाधव युट्युबवर प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक व्हिडीओ युट्युबवर अपलोड केलेले आढळतील. नामदेवराव जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरु’ हे पुस्तक लिहील्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांचे अनेक मोटिव्हेशनल व्हिडीओ युट्युबवर पाहीले जातात. तर त्यांच्याबद्दल चला जाणून घेऊया अधिक माहीती …
पुणे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवार अशी जहरी टिका करणाऱ्या त्यांच्या नावाच्या पोस्ट आणि फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. नामदेवराव सध्या भाजपाशी संबंधित नेत्यांसोबत छायाचित्रात दिसत असतात. मात्र त्यांचे शरद पवार यांच्या सोबतचेही फोटो सध्या व्हायरल होत आहेत. त्यामुळे नामदेवराव जाधव यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. नामदेवराव जाधव यांचा पेशा काय ? ते नेमके काय करतात याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
मोटिव्हेशनल स्पिकर्स म्हणून नामदेव जाधव फेमस आहेत, याआधी त्यांनी आपली सुरुवात लेखक म्हणून केली होती. त्यांनी सर्वात आधी ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरु’ हे पुस्तक लिहिल्याने ते प्रसिद्धीच्या झोतात आले. या पुस्तकाचा खप वाढल्यानंतर त्यांची लेखक म्हणून अन्य पुस्तके आली. त्यानंतर त्यांनी तरुणा मोटिव्हेशनल करण्यासाठी व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. त्यांच्याकडील रसाळ वाणीमुळे आणि साध्या सोप्या शब्दात लोकांना आवडेल अशा सोप्या भाषेतील त्यांच्या भाषणांनी ते युट्युबवर ते प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी मध्यंतरी त्यांनी मटण घेण्याऐवजी माझी पुस्तकं वाचा अशी पोस्ट फेसबुकवर केल्याने मासांहारी प्रचंड नाराज झाले होते.
दोषींवर कारवाई करा
माझ्या संरक्षणासाठी पोलीस होते. कांबळे नावाचा पोलीस होता. त्याने माझं संरक्षण केलं. त्याच्या जीवालाही धोका होता. माझ्याही जीवाला धोका होता. हा लोकशाहीवरील हल्ला आहे. ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. लोकशाहीवरील हा हल्ला आहे. पोलिसांवरील हल्ला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला चॅलेंज करणारा हा हल्ला आहे. जेवढे लोक दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.
खासदारकी, आमदारकी रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार
हा हल्ला फक्त माझ्यावरचा नाही तर पाच कोटी मराठ्यांवरचा हा हल्ला आहे, असं मी समजतो. मी सीपी ऑफिसला जात आहे. कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. मी कार्यकर्त्यांना या हल्ल्याला जबाबदार धरणार नाही. एफआयआरमध्ये पहिलं नाव शरद पवार यांचं असणार आहे. दुसरं नाव रोहित पवार यांचं असणार आहे. या दोघांची आमदारकी आणि खासदारकी रद्द करण्यासाठी मी प्रचंड मोठं आंदोलन करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.