लेखणी बुलंद टीम:
वारंवार सांगूनसुद्धा गटारातील गाळ कित्येक दिवस गटाराबाहेर ठेवला जातो. आयुक्तांचे निर्देश आहेत कि 48 तासात गाळ उचलला गेला पाहिजे. मात्र असे असताना कंत्राटदार मस्त, अधिकारी पैसे खाऊन सुस्त आणि जनता त्रस्त पण मनसे ठेवणार गस्त. असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) एम पूर्व मनपा कार्यालयात चक्क गटारातील गाळ फेकत राडा (MNS Protest) घातला आहे. मनसे मानखुर्द विभागाचे अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी खळखट्याक आंदोलन करत हा राडा घातला आहे. त्यामुळे काही काळ मनपा कार्यालयात गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले होते. तर आता तरी प्रशासन यावर तोडगा काढेल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मनपा आयुक्तांचे निर्देश असतांना नियमांची पायमल्ली
मनपा आयुक्तांचे निर्देश आहेत कि 48 तासात गाळ उचलला गेला पाहिजे. मात्र या निमयांकडे कंत्राटदार,मनपा अधिकारी आणि स्थानिक सत्ताधारी दुर्लक्ष करतात. मात्र त्याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतो . म्हणून या गाळाचा त्रास काय होतो, त्यातून किती घाण वास येतो, हे अधिकारी लोकांना पण कळावे म्हणून हा गाळ आज पालिकेच्या कार्यलयात टाकला आणि सहाय्य्क आयुक्तांना भेटून आवाहन केले. अशी प्रतिक्रिया मनसे मानखुर्द विभागाचे अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी दिली आहे. यावेळी सोबत उपविभाग अध्यक्ष आबा वाटेगावकर, शाखाध्यक्ष सनी शिंदे, मनवासे चिटणीस कैलास खुडे, रोजगार चिटणीस आकाश साठे,मनविसे सचिव जितू मुढे, इंद्रजित खांडेकर लक्ष्मण आलदर, निलेश अभंग, रोहित पांचाळ व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.