नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत तरुण, महिला, व्यापारी, कामगार अशा सर्वच वर्गाला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे राजकीय पक्ष आकर्षित करणारी आश्वासनं देत आहेत. राज्यात गेल्या काही काळात शेतीचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळेच कर्जमाफी, हमीभाव, वीजबील माफी अशी अश्वासनं काही पक्षांनी दिली आहेत. राज्यात सोयाबीनला हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. हीच बाब लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एका भाषणात ‘सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी महायुतीचे सरकारने पाच हजार रुपयांची स्वतंत्र मदत दिली. आता सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात येईल’, अशी घोषणा केली.

हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास….
दिवाळीपूर्वी येणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनची लागवड शेतकरी करतो. विदर्भ, मराठवाड्यात सोयाबीनचे अधिक उत्पादन होते. विदर्भाचा विचार करता वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील काही भागात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. एकट्या पश्चिम विदर्भात 71 अब्ज रुपयांहून अधिकचे सोयाबीनचे उत्पादन होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या शेतकऱ्यांना आधार म्हणून महायुती सरकारने पूर्वी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजनेची घोषणा केली. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार, असे आश्वासन दिले.

3 लाखांपर्यंतचे कर्ज माफ, सोयाबीनला हमीभाव देऊ, काँग्रेसचे आश्वासन
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही राज्यातील शेतकऱ्यांना मोठी आश्वासनं दिलं आहेत. आम्ही सोयाबीन पिकाला हमीभाव देऊ. तसेच हमीभावासह शेतकऱ्यांना बोनसही देऊ, अशी घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. यासह सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू, असे आश्वासनही काँग्रेसने दिलेले आहे. काँग्रेसने या निवडणुकीत शेतकरी, महिला, तरुणांनाही अनेक आश्वासनं दिली आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *