नागपूर शहराच्या महाल परिसरात 17 मार्च रोजी दोन गटात झालेल्या तूफान राडा आणि दगडफेकीनंतर दंगल उसळली होती. या हिंसाचार प्रकरणाबाबत (Nagpur Violance) आता नवी माहिती समोर आली आहे. नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी असलेल्या फहीम खान (Faheem Khan) याचा जामीन अर्ज नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. फहीम खानवर असलेले आरोप आणि पोलिसांचा सुरु असलेला तपासाची स्थिती बघता न्यायालयाने जामीन द्यायला नकार दिला आहे. 17 मार्चला नागपूर मध्ये हिंसाचार घडला आणि 18 मार्चला फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती. सध्या फहीम खान हा नागपूर कारागृहात आहे. दरम्यान त्याने केलेल्या जमीन अर्जावर नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय देऊन हा अर्ज फेटाळून लावला आहे.
रेजाझ सिद्दीकीची मैत्रीण शिक्षणापासून सहा महिन्यासाठी निलंबीत
दुसरीकडे, अशीच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कथित अर्बन नक्षलवादी रेजाझ सिद्दीकीची मैत्रीण शिक्षणापासून सहा महिन्यासाठी निलंबीत करण्यात आली आहे. सिम्बायोसीस विद्यापीठाच्या शिस्तभंग चौकशी समितीत रेजाझची मैत्रीण दोषी आढळली आहे. सिम्बायोसीस विद्यापीठाकडून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती देण्यात आलीय. विद्यापीठाने 10 मे रोजी तिला निलंबित केले होते, त्याविरोधात तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर 8 मे रोजी ती मैत्रिणी नागपूरातील एका हॅाटेलमध्ये रेजाझसोबत होती. रेजाझने सोशल मिडियावर ॲापरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्यावर टीका केली होती. रेजाझ गेल्या अनेक वर्षांपासून शहरी नक्षलवादी नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती ही तपास यंत्रणेच्या हाती लागली आहे.
तपास यंत्रणांच्या रडार वर ‘ती’ तरुणी
दरम्यान, अलिकडेच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर विरोधात समाजमाध्यमवर वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर गुप्तहेर यंत्रणांच्या सूचनेवरून नागपूरात रजास सिद्दीकीला नागपुरात अटक करण्यात आली होती. अटकेच्या वेळेला त्याच्यासोबत नागपूरच्या नामांकित विधी महाविद्यालयात एलएलबीच्या पाचव्या सत्रात शिकणारी एक बिहार मधील तरुणी ही होती. ती रजास सिद्दीकी सारख्या माओवादी विचारसरणीच्या तरुणासोबत असल्यामुळे संबंधित तरुणीला ही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र अजून पर्यंत पोलिसांनी तिला अटक केलेली नाही. मात्र तपास यंत्रणांच्या रडार वर ती तरुणी असल्याचे बोललं जात आहे. अशातच आता तिच्यावर शिक्षणापासून सहा महिन्यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा
गपगुमान शस्त्र खाली ठेवा, आत्मसमर्पण करा अन् आमच्यासारखं सन्मानाने जगा; आत्मसमर्पण करणाऱ्या माओवादी कमांडरच्या माओवाद्यांना निर्वाणीचा सल्ला