‘माझ्या मुलाला फसवलं गेलंय, आम्हाला मारहाण केली’, बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांचा खळबळजनक आरोप

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये शाळेतील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदे याच्या वडिलांनी एक खळबळजनक दावा केला आहे. माझ्या मुलाला याप्रकरणात फसवले जात असल्याचा दावा अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केला. त्यामुळे आता याप्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

 

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे आई-वडील आणि लहान भावाशी मोबाईल फोनवरुन (Mobile Phone) संपर्क साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण देणारा दावा केला. अक्षय शिंदे याने मुलींसोबत जे काही केले, तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. अक्षयला फसवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे अक्षयला फसवलं जात असल्याचंही सांगितलं.

अक्षयचं काम बाथरूम सफाईचे आहे, तो बाथरुममध्ये कसा जाणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमच्या घरातील सगळ्यांना मारहाण झाली आहे. पोलीस ठाण्यात गेल्यावर आम्हाला अक्षयनं काहीतरी केलं आहे, असे सांगण्यात आले. तसेच, अक्षयची पुन्हा मेडिकल चाचणी करा, अशी मागणीही अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी केली आहे.

 

अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड

बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे हा बदलापूर पूर्वच्या खरवई गावातला रहिवासी आहे. त्याच्या घराची गावकऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. अक्षयचे नातेवाईकही याच चाळीत राहतात. गावकऱ्यांनी त्यांच्याही घराची तोडफोड केली आहे. अक्षयचं कुटुंब हे सध्या गावातून पळून गेलं आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षयची तीन लग्न झाली होती. पण त्याची एकही पत्नी सध्या त्याच्यासोबत राहत नसल्याचंही शेजाऱ्यानं सांगितलं.

 

या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा मुळचा कर्नाटक गुलबर्गा येथील असून तिथे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबालाही अक्षयच्या कृत्याचा सामना करावा लागला. गावकऱ्यांनी त्याच्या घराची तोडफोड केली, भितीनं अक्षयचं कुटुंब तिथून पळून गेल्याची माहिती मिळत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *