हरियाणाची वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर आणि तिचा पती दीपक हुड्डा यांच्यातील वाद थांबता थांबत नाहीये. स्वीटी बुरा हिने पोलीस ठाण्यात भाजप नेता आणि पती दीपक हुड्डाला मारहाण केली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता त्याच स्वीटी बुराने सोशल मीडियावर लाईव्ह येत मोठे दावे केले आहेत.
माझ्या नवऱ्याला मुलांमध्ये इंटरेस्ट, स्वीटी बुराचा गंभीर आरोप
स्वीटी बुरा म्हणाली, माझा पती गे आहे, त्याला मुलांमध्ये इंटरेस्ट आहे. मला त्याने व्हिडीओ दाखवण्यासाठी बोलावले होते. मात्र, व्हिडीओचा सुरुवातीचा आणि शेवटचा हिस्सा कट करण्यात आला. कट करण्यात आलेल्या भागात दीपकने मला शिवीगाळ केली होती. त्यानंतर मला पॅनिक अटॅक आला होता. पुढे बोलताना स्वीटीने आरोप केलाय की, एसपीची दीपकसोबत मिळालेला आहे. दोघांनाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
स्वीटी पुढे बोलताना म्हणाली, व्हिडीओ कट करुन सर्वांसमोर दाखवण्यात आला आहे. माझे वडिल आणि मामा यांचं नाव दीपकने एफआयआर मध्ये नोंदवलं आहे. मात्र, व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, माझे वडिल आणि मामा दीपक जवळ नव्हते. दीपकने खोट्या वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत आणि माझ्या मामा आणि वडिलांवर खोटी एफआयआर नोंदवली आहे.
स्वीटीने हात जोडून सांगितले की, मी इतकी वाईट आहे तर दीपक तिला घटस्फोट का देत नाही. मी फक्त घटस्फोट मागत आहे बाकी काही नाही. मी ना मालमत्ता मागितली ना पैसे, अगदी दीपकने माझ्याकडून पैसे घेतलेले आहेत.
स्वीटी आणि दीपकचे 3 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. स्विटीने तिचा पती दीपक याच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. लग्नात एक कोटी रुपये आणि फॉर्च्युनर देऊनही कमी हुंड्यासाठी छळ केला जात असल्याचे तिने सांगितले. दीपकने स्वीटी आणि तिच्या कुटुंबियांची मालमत्ता हडप केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला होता. दीपकने सांगितले की, स्वीटीने झोपेत असताना त्याचे डोके फोडले आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केला. दोघांच्या तक्रारीवरून हिसार आणि रोहतकमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्वीटी आणि दीपक सध्या भाजपचे नेते आहेत. दीपक यांनी मेहम मतदारसंघातून मागील विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता.