तोंडातील अल्सर ठरू शकते तुमच्या माऊथ कॅन्सर च कारण, घ्या जाणून

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

आपल्यापैकी बहुतेकांना कधी ना कधी तोंडात अल्सर होत असतात म्हणजे सतत तोंड येण्याची समस्या होत असते. तोंडातील अल्सर आत गालाच्या आतील भागात किंवा ओठांच्या मागे किंवा जिभेला फोड येतात होतात. सहसा तोंडातील अल्सर स्वतःहून निघून जातात म्हणजे ते उष्णतेने किंवा हार्मोनल संतूलन बिघडल्याने येत असतात त्यामुळे ते काही काळानंतर बरे होतात. तोंडातील अल्सर होण्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु तोंडातील अल्सर किंवा तोंड येणे हे कर्करोगाचे देखील लक्षण असू शकते? हा प्रश्न अधिक लोकांच्या मनात येतो कारण तोंडाच्या कर्करोगातही असेच अल्सर दिसून येतात. मग हे कसं ओळखावं पाहुयात.

तोंडातील अल्सर किंवा झालेली जखम ही कॅन्सरची आहे कसे ओळखावे?

तज्ज्ञांच्या मते जर तोंडात सामान्य फोड किंवा तोंड आलं असेल तर ते फोड सहसा आकाराने लहान असतात. त्याचा आकार सुमारे एक मिलिमीटर असतो. ते हिरड्या, जीभ, गालांच्या आतील भागावर आणि आतील ओठांवर दिसून येते. मात्र कॅन्सर अल्सर सहसा सपाट असतात आणि पाण्याने भरलेले असतात. त्याचा रंग पिवळा किंवा पांढरा असू शकतो जो कधीकधी राखाडी रंगात बदलू शकतो. एका वेळी अनेक कॅन्सर फोड दिसू शकतात. जर ते वेदनादायक नसेल. तसेच त्यांच्यातून कोणताही रक्तस्त्राव होत नसेल तर त्यातून कोणताही धोका नाही.

तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

जर कॅन्कर फोड पॅचेससारखे झाले, खूप फुगले, रक्तस्त्राव सुरू झाला आणि जर जो थांबला नाही आणि बरा झाला नाही, तर ते नक्कीच धोक्याचे संकेत असू शकतात. जर जीभेची चवही गेली आणि औषधानेही ती जखम बरी झाली नाही, तर तो देखील धोक्याचा संकेत आहे. जर कॅन्सर फोडाच्या पोतमध्ये बदल झाला आणि त्यासोबत मान, गाल आणि जबड्यात सूज वाढली तर ही कर्करोगाची लक्षणे असू शकतात. इतकेच नाही तर जर तोंडाचा कर्करोग असेल तर त्यामुळे दातांमध्येही समस्या निर्माण होऊ शकतात. या सर्वांसोबतच जर खूप वेदना होत असतील आणि वजनही कमी होऊ लागले तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *