महाराष्ट्रातील एटीएस पथकाकडून मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्याला अटक

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

महाराष्ट्रातील एटीएस पथकाने एका मोठ्या कारवाईत 2011 पासून फरार असलेल्या एका मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्याला अटक केली आहे. लॅपटॉप या नावाने प्रसिद्ध असलेल्या या नक्षलवाद्याला न्यायालयाने 13 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) पुणे यांनी 2011 पासून फरार असलेल्या वॉन्टेड नक्षलवाद्याला अटक केली आहे, ज्याचे नाव प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ लॅपटॉप असे आहे. न्यायालयाने त्याला 13 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे. 3 मे रोजी अटक करण्यात आली.

पुणे एटीएसने सांगितले की, “पुणे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) 3 मे रोजी प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ लॅपटॉप (44) या वॉन्टेड नक्षलवाद्याला अटक केली आहे. तो २०११ पासून फरार होता. त्याला एटीएस ठाणे युनिटकडे सोपवण्यात आले. 4 मे रोजी ठाणे एटीएसने त्याला मुंबई सत्र न्यायालयात हजर केले आणि न्यायालयाने त्याला 13 मे पर्यंत कोठडी सुनावली. ठाणे एटीएस युनिटकडून पुढील तपास सुरू आहे.”

आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ लॅपटॉप वय 44 वर्षे, आड- ताडीवाला रोड, पुणे (सध्या खोपोली येथे राहणारा) हा 2011 मध्ये गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याला माननीय न्यायालयाने फरार घोषित केले आणि त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट आणि घोषणापत्र जारी करण्यात आले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *