हजारो रोग दूर करते चमत्कारी काळी मिरी! एकदा हे वाचाच

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

स्वयंपाकात नेहमी वापरली जाणारी काळी मिरी एक दोन नव्हे तर तब्बल 1000 आजारांवर गुणकारी आहे. काळ्या मिरीच्या सेवनाने वात आणि कफ बरा होतो. काळी मिरी खाल्ल्याने भूक वाढते, अन्न पचनास मदत होते. यकृताचं आरोग्य चांगलं राहतं. पोटातील कीडे मारले जातात. एवढेच नव्हेतर लघवीला व्यवस्थित होतं आमि दम्यावरही रामबाण उपाय म्हणून काळी मिरी उपयोगी पडते. शिवाय काळी मिरीचे कोणतेच साईड इफेक्ट नाही. तिच्यात औषधी गुण आहेत. मात्र, कोणत्याही पदार्थाचं प्रमाणशीर सेवन केलं पाहिजे. नाही तर त्याचा त्रास होतो.

काळ्या मिरीचे फायदे…

काळी मिरी सलाड, कापलेली फळं, डाळ किंवा भाज्यांमध्ये वापरली जाते. घरगुती इलाजासाठीही तिचा वापर केला जातो. काळ्या मिरीमध्ये औषधी गुण आहेत. या काळी मिरीचे कोणते रामबाण उपाय आहेत. त्यावर आज प्रकाश टाकूया.

अर्धा चमचा काळी मिरीची पावडर तुपात टाकून रोज सकाळी आणि संध्याकाळी खाल्ल्यास नजर तेज होते. दृष्टीदोष दूर होण्यास मदत होते.
काळी मिरीचे चार पाच दाणे, किशमिशचे 15 दाणे तोंडात टाकून चघळा. त्यामुळे खोकला दूर होतो.

मधात काळी मिरीची पावडर टाकून तीन चार वेळा तिचं चाटण घेतल्यास खोकला थांबतो.

काळी मिरी ही उत्तम अँटीऑक्सिडंट आहे. काळी मिरी अँटीबॅक्टेरिअलचं काम करते. मँगनीज आणि लोहासारख्या पोषक तत्त्वांचा तो चांगला स्त्रोत आहे. शरीराचं कार्य उत्तम ठेवण्यास त्याने मदत होते.

गॅस झाल्यावर पोट फुगल्यास काळी मिरी खा. त्यामुळे गॅसची समस्या दूर होते.

काळी मिरीला सुईने छिद्र पाडा आणि ती आगीवर भाजा. त्यातून निघालेला धूर नाकाने शरीरात घ्या. हा प्रयोग केल्यास डोकेदुखी बंद होते. उचकी येणंही बंद होतं.

20 ग्रॅम काळी मिरी , जिरे 10 ग्रॅम आणि साखर 15 ग्रॅम घेऊन त्याचं मिश्रण करा. त्यानंतर ते पाण्यात टाकून सकाळी संध्याकाळी घ्या. मूळव्याधापासून राम मिळेल.

पांढरी मिरी डोळे आणि कपाळासाठी उपयुक्त मानली जाते. पीठात देशी तूप घाला. त्यात थोडी साखर टाकून सफेद काळी मिरी पावडर टाका. आणि त्याचं सकाळी तसेच संध्याकाळी सेवन करा.

त्वचेवर फोडं आले असतील तर काळी मिरीवर थोडं पाणी टाकून ती दगडावर घासा. त्यानंतर करंगळी बाजूच्या बोटाने फोडीवर ते मलम लावा, त्यामुळे फोडी गायब होते.

तुमचा रक्तदाब कमी होत असेल तर दिवसातून दोन तीन वेळा पाच दाने काळी मिरी आणि किशमिशचे 21 दाणे खा.

काळी मिरी, हिंग, कापूर (सर्व पाच पाच ग्रॅम) यांचं मिश्रण बनवा. त्यानंतर राई एवढ्या गोळ्या बनवा. प्रत्येक तीन तासानंतर एक गोळी खाल्ल्यावर उलटी, दस्त बंद होतील.

सर्दी झाल्यावर काळी मिरीचे चार पाच दाणे वाटून एक कप दूधात गरम करून प्या. सकाळ संध्याकाळी हे दूध प्यायल्यास आराम मिळतो.

एक चमच मधात दोन ते तीन बारीक कुटलेल्या काळी मिरी आणि चिमूटभर हळदी पावडर टाकून प्या. त्यामुळे कफ बरा होतो.
काळी मिरीच्या सेवनाने शरीराचा थकवा दूर होतो, गळ्यातील खवखव दूर होते.काळ्या मिरीचा चहा घेतल्यावर सर्दी पडसे, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनपासून आराम मिळतो. काळी मिरीमुळे पाचन क्रियाही सुधारते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *