शहरातील राजगुरुनगर जवळील चांडोलीत (Pune) अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या 4 महिन्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची ही चौथी घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्या आचाऱ्यासोबत ही मुलगी आचारी कामात मदत करत होती, त्या आचारी काम करणाऱ्या नराधमानेच अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. आता, चांडोली येथील केदारेश्वर बंधाऱ्यावर या मुलीची ओढणी आणि चप्पल आढळून आल्याने पीडित मुलीने आत्महत्या केली का काय? अशी शंका उपस्थित होत असून सध्या बंधाऱ्यात मुलीचा शोध घेतला जात आहे. दुसरीकडे पोलिसांकडून (Police) आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची देखील कसून चौकशी सुरू आहे.
सध्या हुंड्याच्या छळापायी एका विवाहितेनं आत्महत्या करुन जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली हे. एका अल्पवयीन मुलीवर आचाऱ्याकडून अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तरुणी 3 दिवसांपासून बेपत्ता आहे. चांडोली येथील केदारेश्वर बंधाऱ्यावर अल्पवयीन मुलीची ओढणी व चप्पल मिळून आल्याने पीडित मुलीने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर NDRF च्या दोन टिमकडून भिमा नदीवरील केदारेश्वर बंधाऱ्यावर तीन दिवसांपासुन शोध मोहिम सुरू आहे. पीडित बहिणीच्या तक्रारीवरुन राजगुरुनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. मात्र, पीडित तरुणीवरुन अत्याचार झाल्यानंतरही तीन दिवसांनंतरही ती आढळून येत नसल्याने कुटुंबीयांकडून अधिकची काळजी केली जात आहे.