आजपासून दुधाच्या किमतींवर 2 रुपयांनी दर वाढ,जाणून घ्या किंमती

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 दुधाच्या दरात 2 रूपयांची दरवाढ (Milk Rate Increase) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून (15 मार्च) ही दरवाढ लागू होणार आहे. त्यामुळे गायीचं दूध आता प्रतिलिटर 58 रूपये तर म्हशीचं दूध प्रतिलिटर 74 रूपयांना मिळेल. काल पुण्यात कात्रज दूध संघाच्या मुख्यालयात सहकारी आणि खासगी दूध संघाची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. पुण्यासह मुंबईत पिशवीतलं दूधही महागणार आहे.

आम्हाला हे परवडत नाही सर्वांनी विचार करावा-
आजपासून दुधाच्या किमतींवर 2 रुपयांनी दर वाढ झाली आहे. दूध संघटनांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय आमच्या खिशाला कात्री लावणारा आहे असे ग्राहकांचे मत आहे. तर आम्हाला हे परवडत नाही सर्वांनी विचार करावा, असे ही ग्राहक बोलत आहे. विक्रेत्यांच्या मते दरवाढ तर झालेली आहे, इतर गोष्टींची ही महागाई झालेली आहे. ग्राहकांना नवे दर समजावून सांगावे लागतील असे मत आहे.

2 रुपयांप्रमाणे दुधाच्या दरवाढीचा निर्णय एकमताने घेण्यात आला-
2 रुपयांप्रमाणे दुधाच्या दरवाढीचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सध्याची महागाई पाहता दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचारु करुन दुधाच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव दर हे 15 मार्चपासून लागू करण्यात येणार आहेत, असं दूध उत्पादक व कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात भेसळयुक्त पनीरची विक्री होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्याबाबत भेसळखोरांवर कडक करवाई करण्याची एकमुखी मागणी बैठकीत दूध संघाच्या प्रतिनिधींनी केली. राज्यात दुधाचे संकलन आता सकाळ आणि संध्याकाळ असे दोनवेळा करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *