केंद्रीय गुप्तचर विभागात 3717 ‘गुप्तचर अधिकारी’ पदांसाठी मेगा भरती

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

इंटेलिजेंस ब्युरो (IB), केंद्रीय गुप्तचर विभाग, यांनी सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड II/कार्यकारी (ACIO-II/Executive) या पदांसाठी मेगा भरतीची घोषणा केली आहे. देशभरात एकूण 3717 रिक्त जागांसाठी ही संधी उपलब्ध आहे.

पदाचे तपशील:
पदाचे नाव: सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड II/कार्यकारी (ACIO-II/Executive)

एकूण रिक्त पदे: 3717

recommended by
आणि C साठी मेगा संधी!
AIIMS Recruitment 2025 : AIIMS मध्ये 2300+ पदांसाठी भरती, गट B आणि C साठी मेगा संधी!
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 19 जुलै 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2025

शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduation) किंवा समकक्ष अर्हता असणे आवश्यक आहे.

यासोबतच संगणकाचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. (अधिक तपशीलांसाठी मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा (10 ऑगस्ट 2025 रोजी):
किमान वय: 18 वर्षे

कमाल वय: 27 वर्षे

वयात सवलत:

SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट

OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट

विभागीय उमेदवारांसाठी 40 वर्षांपर्यंत (3 वर्षांची नियमित सेवा पूर्ण केलेल्या)

विधवा, घटस्फोटित महिला आणि कायदेशीररित्या पतीपासून विभक्त झालेल्या, पुनर्विवाह न केलेल्या महिलांसाठी: UR – 35 वर्षे, OBC – 38 वर्षे, SC/ST – 40 वर्षे.

माजी सैनिक आणि प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासनाच्या नियमांनुसार वयात सवलत.

वेतन:
स्तर 7: रुपये 44,900/- ते रुपये 1,42,400/-

अर्ज शुल्क:
जनरल/EWS/OBC: रु. 650/-

SC/ST/मागासवर्गीय/EWS/महिला/माजी सैनिक: रु. 550/-

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

लेखी परीक्षा (Written Exam): 100 गुण

वर्णनात्मक चाचणी (Descriptive Test): 50 गुण

मुलाखत (Interview): 100 गुण

कागदपत्र पडताळणी (Document Verification)

वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी 19 जुलै 2025 पासून ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करावी आणि 10 ऑगस्ट 2025 या अंतिम मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करावा. अधिक माहिती आणि तपशीलवार जाहिरातीसाठी, इंटेलिजेंस ब्युरोच्या अधिकृत वेबसाइट https://www.mha.gov.in/ ला भेट द्या.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *