वैद्यकीय आयोगाकडून महाराष्ट्रातील 30 वैद्यकीय महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 

वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागांच्या वार्षिक नूतनीकरणासाठी करण्यात आलेल्या तपासणीत आवश्यक मानकांची पूर्तता न केल्याबद्दल राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) महाराष्ट्रातील 30 वैद्यकीय महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या संस्थांमध्ये राज्यातील अलीकडेच मान्यताप्राप्त 10 वैद्यकीय महाविद्यालये, मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि पुण्यातील आर्मी वैद्यकीय महाविद्यालय यांचा समावेश आहे.एनएमसीने जारी केलेल्या नोटीसला असमाधानकारक प्रतिसाद मिळाल्यामुळे, आयोगाने राज्य वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि डीएमईआर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय) चे संचालक यांना आयोगासमोर हजर राहण्याचे थेट निर्देश दिले आहेत.या प्रक्रियेअंतर्गत, महाविद्यालयांनी सादर केलेले स्व-घोषणापत्र, आधार आधारित बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीतील शिक्षकांच्या उपस्थितीचा डेटा, वैद्यकीय आणि पायाभूत सुविधांचे सखोल मूल्यांकन करण्यात आले. या तपासणीत असे आढळून आले की अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी आहे. वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक पायाभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत. यामुळे30 वैद्यकीय महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *