खंडणी प्रकरणाबाबात वाल्मिक कराड यांना आज बीडच्या केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी केज न्यायालयानं महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.खंडणी प्रकरणाबाबात वाल्मिक कराड यांना आज बीडच्या केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी केज न्यायालयानं महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावला आहे. कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपली आहे. त्यानंतर आज केज न्यायालयात सुनावणी झाली, त्यावेळी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. तसेच 14 दिवसांची न्यायालयीनं कोठडी देण्यात आली आहे.
कोर्टात नेमकं काय झालं?
आज न्यायालयात सुनावणीला सुरुवात होताच तपास अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडची दहा दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती. व्हाईस सॅम्पल घेतला गेला आहे. तीन मोबाईल वाल्मीक कराड यांचे जप्त केले आहेत. संपत्ती कोणत्या गुन्ह्यातून कमावली आहे का हे तपासायचे म्हणून पीसीआर हवा आहे, असं तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले. भारतात अथवा भारताबाहेर काही संपत्ती आहे का?, याचा तपास करायचा आहे, असं तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले होते.
वाल्मिक कराडच्या वकीलाचाही जोरदार युक्तीवाद
वाल्मिक कराडच्या वकिलाने देखील कोर्टात जोरदार युक्तिवाद केला आहे. वाल्मि कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे म्हणाले की, 15 दिवसांपासून वाल्मिक कराड पोलिसाच्या ताब्यात आहे. आणखी कोणता तपास बाकी आहे. बँक खात्याची चौकशी कऱण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यासाठी आरोपीची गरज नाही. यापूर्वीचे त्यांच्याविरोधातले 14 गुन्हे नील झाले आहेत. मग त्या गुन्ह्यांचा तपास का करायचा आहे?, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची एकत्र चौकशी करायची होती, तर मग दोन्ही आरोपी 10 दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे मग तेव्हा का नाही केली? हा सगळा तपास 15 दिवसांपुर्वी करणार होतात. मग 15 दिवसांत काय तपास केला? असा युक्तिवाद वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंनी केला. तसेच वाल्मिक कराड तपासात सहकार्य करत नाही असं तुमचं म्हणणं असेल तर 15 दिवसांत त्यांनी काय सहकार्य केलं नाही ते आम्हाला सांगा. आता पोलीस कोठडीची गरज नाही, असंही सिद्धेश्वर ठोंबरे म्हणाले होते.
दरम्यान, वाल्मिक कराडला आज बीड जेलमध्ये नेलं जाणार आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवलं जाईल. त्यानंतर उद्या मकोका अंतर्गत ताब्यात घेऊन केज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. पण आता सेशन कोर्टामध्ये सीआयडीने अर्ज केला आहे, कदाचित सीआयडी त्यांना आज सुद्धा हजर व्हा असं म्हणू शकते.