मारुती सुझुकीने आपल्या कमी-बजेट कारमधील ‘या’ व्हेरियंटच्या किंमत कपातीची केली घोषणा

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने सोमवारी आपल्या कमी-बजेट कार Alto K10 आणि S-Presso च्या निवडक व्हेरियंटमधील किंमत कपातीची घोषणा केली. S-Presso LXI पेट्रोलच्या किमतीत 2,000 रुपयांनी तर Alto K10 VXI पेट्रोलच्या किमतीत 6,500 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. मनीकंट्रोलच्या बातमीनुसार, कंपनीने एक्सचेंज फाइलिंगद्वारे ही माहिती दिली आहे. नवीन किंमत 2 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात आली आहे.

Alto K10 VXI पेट्रोल –

मारुती सुझुकीच्या अल्टो K10 पेट्रोल कारमध्ये 998 cc, K10C प्रकारचे इंजिन आहे, जे 49 kW @ 5500 rpm ची कमाल पॉवर आणि 89 Nm @ 3500 rpm कमाल टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 214 लीटरची बूटस्पेस आहे. 5 सीटर Alto K10 ची लांबी 3530 mm आहे, तर रुंदी 1490 mm आणि उंची 1520 mm unladen आहे. कारचा व्हीलबेस 2380 मिमी आहे. कारमध्ये सुरक्षेसह इतरही अनेक वैशिष्ट्ये आहेत.
मिनी SUV S-Presso –

मिनी SUV म्हणून सादर करण्यात आलेले, S-Presso मध्ये 998 cc, K10C प्रकारचे इंजिन आहे, जे कमाल 49 kW (66.621 PS) @ 5500 rpm आणि 89 Nm @ 3500 rpm ची कमाल पॉवर निर्माण करते. त्याची लांबी 3565 मिमी, रुंदी 1520 मिमी आणि उंची 1567 मिमी आहे.

Alto K10 आणि S-Presso ची किंमत –

Alto K10 ची किंमत 3.99 लाख ते 5.96 लाख रुपये आहे, तर S-Presso ची किंमत 4.26 लाख ते 6.11 लाख रुपये दरम्यान आहे. मारुती सुझुकीच्या कारच्या विक्रीमध्ये घट –

मारुती सुझुकी इंडियाने रविवारी माहिती दिली की ऑगस्टमध्ये कंपनीची एकूण विक्री मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 4 टक्क्यांनी घटून 1,81,782 युनिट्सवर आली आहे. तर, गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 1,81,782 वाहनांची विक्री केली होती. गेल्या महिन्यात देशांतर्गत प्रवासी वाहनांची एकूण घाऊक विक्री 1,43,075 युनिट्स होती, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यात 1,56,114 युनिट्सपेक्षा 8 टक्के कमी आहे. अल्टो आणि एस-प्रेसोसह मिनी कारची विक्री एका वर्षापूर्वी 12,209 युनिट्सवरून 10,648 युनिट्सवर घसरली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *