मुंबईतील ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला मोठी आग लागली आहे.अंधेरी पश्चिमेकडील जोगेश्वरी ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली.आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत.आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
10 ते 12 सिलेंडर या आगीमध्ये ब्लास्ट झाले आहे.सदर आगीत 20 ते 25 दुकाने जळून खाक झाली आहे.या भागात मोठ्या प्रमाणात फर्निचरच्या मार्केट आहेत.आग मोठ्या प्रमाणात या फर्निचरच्या दुकानांमधून वाढली आहे. त्यामुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण आहे.