पाकिस्तानमध्ये मोठा हल्ला! सुमारे 90 जवान ठार

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा मोठा हल्ला झाला आहे. यावेळी बलुच दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केल्याने हा हल्ला भारतातील पुलवामा हल्ल्यासारखाच असल्याचे दिसत आहे. बलुचिस्तानमधील नोश्की येथे सुरक्षा दलाच्या सात बस आणि दोन गाड्यांवर हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 5 सैनिकांचा मृत्यू झाला असून 13 सैनिक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची माहिती देताना बीएलएने दावा केला आहे की, या हल्ल्यात सुमारे 90 जवान शहीद झाले आहेत.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार, एस बस व्हिकल बोर्न आयईडीची शिकार ठरली आहे. हा आत्मघाती हमलाच आहे. तर दुसरी बस क्वेटाहून ताफ्तानला जाताना रॉकेट संचलित ग्रेनेडची शिकार ठरली आहे. या हल्ल्ल्यातील जखमींना उपचारासाठी नोश्की आणि एफसी कँपला नेण्यात आलं आहे. नोश्कीच्या एसएचओ सुमालानीने या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी असल्याचं सांगून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

 

बलूच आर्मी काय म्हणाली?

या हल्ल्ल्यानंतर बलूच लिबरेशन आर्मीने आपलं म्हणणं मांडलं आहे. बलूच लिबरेशन आर्मीच्या मजीद ब्रिगेडने काही तासांपूर्वी नोशकीमध्ये आरसीडी हायवेवर रखशान जवळ वीबीआयईडी फिदाई हमला केला. आमच्या ताब्यातील पाकिस्तानी सैनिकांना निशाणा बनवलं आहे. या ताफ्यात 8 बसेस होत्या. यातील एक बस स्फोटात पूर्णपणे नष्ट झाली आहे.

हमल्यानंतर बीएलएने पुढे लगेचच एका बसला पूर्णपणे घेरलं. त्यातील सर्व सैनिकांना एक एक करून ठार केलं. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यातील मृतांची संख्या 90 झाली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *